एके काळचा एक यशस्वी अभिनेता आणि देखणा हंक, कबीर बेदी (Kabir Bedi) वयाच्या 75 व्या वर्षीही तसेच चमकत आहेत. वेब सिरीज असो वा चित्रपट, कबीर बेदींची उपस्थिती स्वतःमध्ये खास आहे. बॉलीवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये आपली प्रतिभा आणि क्षमता सिद्ध करणाऱ्या कबीर बेदी यांना एखाद्या भूमिकेसाठी राजी करणे सोपे काम नाही. पण नुकतेच विरोधाभास घडला. फक्त फोनवर चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर बेदी यांनी चित्रपटासाठी लगेच होकार दिला आणि नुकतेच त्यांनी ‘द जंगीपूर ट्रायल’ चित्रपटाचे शुटींगही पूर्ण केले.
महत्वाचे म्हणजे या चित्रपटाच्या शुटींगसाठी कबीर बेदी यांना दररोज 8 तास प्रवास करावा लागला. 'द जंगीपूर ट्रायल' चित्रपटाचे दिग्दर्शक देबादित्य बंदोपाध्याय आणि क्रिएटिव्ह प्रोड्युसर अमित बहल यांनी कबीर बेदींना फोनवर चित्रपटाची कथा सांगितली, तेव्हा त्यांना चित्रपटाचे कथानक खूप आवडले आणि त्यांनी लगेच त्यासाठी होकार दिला. शूटिंगसाठी पहिली फ्लाइट घेऊन ते जॉय सिटी म्हणजेच कोलकाता येथे पोहोचले. तेथून शुटींगसाठी 8 तासात ते जंगीपूर, मुर्शिदाबाद, मोरेगाव, अझीमगंज आणि बेहरामपूर सारख्या ठिकाणी पोहोचायचे.
कबीर बेदी म्हणतात, ‘मला चित्रपटाची कथा, कथानक आणि स्टारकास्ट खूप आवडली. यात अनेक चांगले कलाकार आहेत जे त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर नेतील.’ शूटिंग लोकेशनबद्दल बोलायचे झाले तर 'द जंगीपूर ट्रायल'चे शूटिंग अशा ठिकाणी झाले आहे जिथे आजपर्यंत एकाही हिंदी चित्रपटाचे शूटिंग झाले नाही. कोलकातापासून 8 तासांच्या अंतरावर असलेल्या या सुंदर ठिकाणी निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण केली आहे. तेथील सुंदर हवेल्या आणि दृश्ये दिग्दर्शकाने या चित्रपटात टिपली आहेत. या चित्रपटाची कथा इतकी दमदार होती की, दररोज शहर ते गाव असा सलग 8 तासांचा प्रवास केल्यानंतरही हे सर्व स्टार्स उत्साहात असायचे.
'द जंगीपूर ट्रायल' हा मल्टिस्टारर चित्रपट आहे. कबीर बेदी व्यतिरिक्त या चित्रपटात झाकीर हुसेन, जावेद जाफरी, व्रजेश हिरजी, कन्नन अरुणाचल, अमित बहल, इश्तेयाक खान, सुशील पांडे, रवी झंकल, जय उपाध्याय, दीपक काझीर, समिक्षा भटनागर, चिराग वोरा, राजेश खट्टर आणि सताब हे कलाकार आहेत. पश्चिम बंगालमध्ये तीन वेळा खासदार राहिलेल्या सुपरस्टार या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. या चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून, त्यामध्ये गोल्डन एरामधील सिंगल थिएटर्सची गजबज आणि त्यातून निर्माण झालेल्या हत्येचे रहस्य पाहायला मिळेल.