अजय देवगण (Ajay Devgn) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) यांचा 'थँक गॉड' (Thank God) हा चित्रपट 24 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, जो लोकांना खूप आवडला. तेव्हापासून प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र रिलीजपूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'थँक गॉड' अभिनेते अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रासह दिग्दर्शक इंद्र कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'थँक गॉड'चे दिग्दर्शक इंद्र कुमार, अभिनेते अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यावर लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप आहे. यूपीमध्ये राहणाऱ्या हिमांशू श्रीवास्तव नावाच्या वकिलाने 'थँक गॉड'चा ट्रेलर पाहिल्यानंतर या स्टार्सविरोधात जौनपूर कोर्टात तक्रार दाखल केली आहे.
हिमांशू श्रीवास्तव यांच्या तक्रारीत लिहिले आहे की, हिंदू पुराणानुसार चित्रगुप्त लोकांच्या चांगल्या-वाईट कर्माचा हिशेब ठेवतो, त्याला कर्मदेवता असेही म्हणतात. यामुळे त्याचे ज्या पद्धतीने चित्रण या चित्रपटात केले आहे ते योग्य नाही. यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'थँक गॉड'च्या ट्रेलरमध्ये चित्रगुप्ताला मॉडर्न लूकमध्ये सूट-बूट घातलेला दाखवण्यात आला आहे. (हेही वाचा: Daler Mehndi: पंजाब कोर्टाकडून गायक दलेर मेहंदीला मोठा दिलासा, तीन वर्षाची शिक्षा केली रद्द)
अजय देवगण चित्रगुप्त हे पात्र सकारात असून, त्याची भाषाही खूप मजेदार आहे. वाराणसीमध्येही या चित्रपटाबाबत रोष उफाळला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये भगवान श्रीचित्रगुप्तांचा अपमान केल्याचा आरोप करत लोक आवाज उठवत आहेत. शहरातील सामाजिक संस्थेच्या लोकांनी गुरुवारी कँट पोलीस ठाण्यात चित्रपटाचा निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आणि इतरांविरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अजय देवगण यांच्याशिवाय रकुल प्रीत सिंह देखील 'थँक गॉड'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 24 ऑक्टोबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.