Tesla Car Light Show On Naatu Naatu Song: RRR चित्रपटातील ऑस्कर पुरस्कार विजेते नाटू-नाटू (Naatu Naatu) हे गाणे केवळ भारतातच नाही तर परदेशातही धुमाकूळ घालत आहे. नुकतेच याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचे शीर्षक मिळाले. तेव्हापासून आजपर्यंत हे गाणे देश-विदेशात खूप चर्चेत आहे. या गाण्यावर लोक नाचत आहेत, आता वाहनेही यावर डान्स करण्यात मागे नाहीत. होय, कदाचित तुम्हाला हे ऐकायला विचित्र वाटत असले तरी हे खरे आहे.
'नाटू-नाटू' या गाण्याचे कौतुक करत टेस्ला कार मालकांनी गाण्याच्या सुरात त्यांच्या कारचे दिवे चमकवले. अमेरिकेतील न्यू जर्सी शहरात हा टेस्ला कार लाइट शो आयोजित करण्यात आला होता. या लाइट शोचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा - 'Naatu Naatu' Wins Oscars 2023: राजामौलींच्या आरआरआरने ऑस्करमध्ये रचला इतिहास, 'Naatu Naatu' ला मिळाला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा पुरस्कार)
राजामौली यांच्या ‘RRR मूव्ही’ या चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, @Teslalightshows light sync with the beats of #Oscar Winning Song #NaatuNaatu in New Jersey सर्वांच्या प्रेमासाठी धन्यवाद.
.@Teslalightshows light sync with the beats of #Oscar Winning Song #NaatuNaatu in New Jersey 🤩😍
Thanks for all the love. #RRRMovie @Tesla @elonmusk pic.twitter.com/wCJIY4sTyr
— RRR Movie (@RRRMovie) March 20, 2023
ट्विटरवर हा व्हिडिओ खूप पाहिला जात आहे. यावर लोक कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रियाही देत आहेत. अनेक यूजर्संना हा व्हिडिओ रिट्विट केला असून तो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे.