Telugu actress S Naga Jhansi suicide case: तेलुगू टीव्ही स्टार अभिनेत्री नागा झांसी (Telugu actress S Naga Jhansi) हिच्या आत्महत्येच्या कारणांचा पोलीस तपासात उलघडा झाला आहे. नागा झांसी आत्महत्या प्रकरणात हैदराबाद पोलिसांनी (Hyderabad police) तिचा प्रियकर सूर्य तेजा (Surya Teja) याला अटक केली आहे. सूर्यतेजा हासुद्धा अभिनेता असून, नागा झांसी हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. हैदराबाद येथील श्रीनगर कॉलनीमध्ये राहत्या घरी नागा झांसी हिचा मृतदेह पोलीसांना आढळून आला होता. तिने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या केली तेव्हा ती घरात एकटीच होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागा झांसी हिच्या मृतदेहाजवळ किंवा घरात इतरत्र कोणतीही सुसाइड नोट मिळाली नाही. परंतु, मोबाईल कॉल रेकॉर्ड तपासात तिचे शेवटचे बोलणे सूर्यतेजा याच्यासोबत झाल्याचे पुढे आले. आत्महत्येचे पाऊल उचलण्यापूर्वी दोन दिवस नागा झांसी ही सातत्याने सूर्य तेजा याला फोन करण्याचा प्रयत्न करत होती. सूर्यतेजा तिचे फोन न स्वीकारता कट करत होता. असेही तपासात पुढे आले आहे.
दरम्यान, सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, गेले काही दिवस नागा झांसी नैराश्येत होती. त्यामुळे तिच्या बॉयफ्रेंडने (सूर्यतेजा) तिच्यासोबत लग्न करण्याच्या प्रस्तावाला नकार दिला होता. आयबीटाईम्सने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, नागा झांसी ही सूर्या याच्यासोबत लग्न करु इच्छित होती. परंतू, सूर्याच्या कुटुंबियांना हा विवाह मान्य नव्हता. नागा झांसी हिच्या कुटुंबियांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे, नागा झांसी ही सूर्य तेजा याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होती. सूर्याने तिच्यासोत विवाह करण्यास नकार दिल्यापासून ती नैराश्येत होती. नात्यात आलेल्या दुराव्यामुळे तिने आत्महत्या केली, आसाही आरोप नागा झांसी हिच्या कुटुंबियांनी केला आहे. (हेही वाचा, लोकप्रिय तेलुगू अभिनेत्री Naga Jhansi ची आत्महत्या; बॉयफ्रेंडशी भांडण झाल्याने उचलले टोकाचे पाऊल)
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नागा झांसी हिचा भाऊ दुर्गा प्रसाद याने बाहेरुन दरवाजा ठोठावला. परंतू, आतून कोणताही प्रतिसाद आला नाही. त्यामुळे त्याने शेजाऱ्यांना या प्रकाराची कल्पना दिली. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून त्यांनी आत प्रवेश केला तर, तिचा मृतदेह छताच्या पंख्याला लटकत होता.