अभिनेत्री तारा सुतारिया ची 'नो एंट्री' मध्ये एन्ट्री?
Tara Sutaria (Photo Credits: Instagram)

स्टुडंट ऑफ द ईअर (Student Of The Year 2) हा चित्रपट म्हणावा तितका बॉक्सऑफिसवर म्हणावा तितका चालला नाही. मात्र या चित्रपटातून पदार्पण केलेली अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) मात्र प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. या चित्रपटानंतर तिच्या घराबाहेर नवनव्या चित्रपटांसाठी निर्मात्यांची जणू रांगच लागली. या चित्रपटामध्ये आता कदाचित 'नो एन्ट्री' (No Entry) या चित्रपटाची एन्ट्री झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 'नो एन्ट्री' च्या सिक्वेलमध्ये तारा झळकणार असल्याचे सांगण्यात येतय.

स्टुडंट ऑफ द ईअर या चित्रपटात ताराची टायगर श्रॉफ सोबत केमिस्ट्री चांगली रंगली. मात्र हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे बॉक्स ऑफिसवर टिकला नाही. तरीही ताराचे या चित्रपटातील काम पाहता तिच्यामागे अनेक चित्रपटांची जणू रांगच लागली.

काही दिवसांपूर्वीच तारानं ‘मरजावा’ या चित्रपटाचं चित्रीकरण संपवलं. यात ती सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंगबरोबर चमकणार आहे. त्यानंतर लवकरच ती सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीसोबत ‘आरएक्स १००’च्या हिंदी रिमेकचं चित्रीकरण सुरू करणार आहे. या चित्रपटातून अहान बॉलिवूडमध्ये पदार्पण करतोय.

हेही वाचा- अर्जुन कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्रा पैकी कोण आहे 'Best Kisser', सांगतेय परिणिती चोपड़ा

या चित्रपटांसोबतच 'नो एन्ट्री' च्या सिक्वेलमध्ये ती दिसणार असल्याचे सांगण्यात येतय. या चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बझ्मी यांना ती नुकतीच भेटल्याचेही सांगण्यात येतय. या चित्रपटात अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.