'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' या चित्रपटाचा आज स्टार प्लस वर वर्ल्ड प्रिमियर; अभिनेता अजय देवगण शेअर केला हा खास व्हिडिओ
Tanhaji: The Unsung Warrior World Premier (Photo Credits: Instagram)

बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करणारा 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर' (Tanhaji: The Unsung Warrior) या चित्रपटाचे केवळ नाव जरी काढले तरी अंगावर काटा येतो. अभिनेता अजय देवगण (Ajay Devgan), सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि शरद केळकर (Sharad Kelkar) यांची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट टीव्हीवर कधी येणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. ही उत्सुकता आज संपणार आहे. आज रात्री 8 वाजता स्टार प्लस (Star Plus) हा चित्रपट आपल्या कुटूंबासह सर्वांना पाहता येणारा आहे. आज प्रथमच स्टार प्लसच्या माध्यमातून वर्ल्ड प्रिमियर होणार आहे. याची आपल्या चाहत्यांना आठवण करुन देण्यासाठी अजय देवगण एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये चित्रपटातील एक दाखविण्यात आला असून आज चित्रपटाची वेळ सांगण्यात आली आहे.

पाहा व्हिडिओ:

हेदेखील वाचा- Tanhaji The Unsung Warrior New Record; 26 व्या दिवशी दुपारी 3 वाजता 'तान्हाजी'ने मोडला 'बाहुबली 2'चा 'हा' विक्रम; जाणून घ्या सविस्तर

अजय देवगण सह या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजंची भूमिका साकारणा-या शरद केळकरने आपल्या इन्स्टा अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या चित्रपटाने 200 कोटीहून अधिक कमाई केली आहे. या चित्रपटाने अजय देवगनच्या स्वत: च्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहे. अजय देवगणचा बॉक्स ऑफिसवरचा सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे.