Tanhaji The Unsung Warrior New Record; 26 व्या दिवशी दुपारी 3 वाजता 'तान्हाजी'ने मोडला 'बाहुबली 2'चा 'हा' विक्रम; जाणून घ्या सविस्तर
प्रभास व अजय देवगण (संग्रहित संपादित प्रतिमा)

भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये दरवर्षी बरेच भव्य, जबरदस्त अ‍ॅक्शनयुक्त चित्रपट प्रदर्शित होतात. यातील अनेक चित्रपट प्रेक्षक बर्‍याच काळापर्यंत आठवणीत ठेवतात. सध्या असाच एक चित्रपट आहे... तान्हाजी द अनसंग वॉरियर (Tanhaji The Unsung Warrior)!. सध्या हा चित्रपट रसिकांची पहिली पसंती आहे. एका विलक्षण कथा आणि करमणुकीने भरलेल्या या चित्रपटाने भारतात तसेच परदेशातही चांगली कमाई केली आहे. ओम राऊत (Om Raut) दिग्दर्शित, अजय देवगण (Ajay Devgan) निर्मित हा मल्टीस्टारर ऐतिहासिक चित्रपट आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत सैफ अली खान, काजोल, नेहा शर्मा आणि शरद केळकर असे तगडे कलाकार आहेत.

याआधी या चित्रपटाने इतर अनेक चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. मात्र आता या चित्रपटाने बाहुबली 2 (Bahubali 2) या बहुचर्चित चित्रपटाचा रेकॉर्डही तोडला आहे. 120  कोटींच्या बजेटसह बनलेला तान्हाजी हा चित्रपट, जगभरातील 4540 स्क्रीनवर प्रदर्शित झाला आहे. मार्स बॉक्स ऑफिसच्या अहवालानुसार, 26 व्या दिवशी दुपारी 3 वाजता या चित्रपटाने बाहुबली 2 चा विक्रम मोडला. प्रदर्शनानंतर 26 व्या दिवसापर्यंत बाहुबली 2 ला 0.13 कोटींचे आगाऊ बुकिंग मिळाले होते. आता याच दिवसापर्यंत तान्हाजीला तब्बल 0.18 कोटींचे आगाऊ बुकिंग मिळाले आहे. चित्रपटाने आतापर्यंत भारतात 251.40 कोटी कमाई केली आहे. (हेही वाचा: 'या' कारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाही पाहिला 'तान्हाजी: द अनसंग वॉरिअर')

या चित्रपटामध्ये अजय देवगणने मराठा साम्राज्याचे सेनापती तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. सिंहगड फत्ते केल्याची कथा या चित्रपटामध्ये दाखवली गेली आहे.सैफ अली खानन साकारलेली उदय भानसिंग राठोडची भूमिकाही प्रेक्षकांना भावली आहे. अभिनयाच्या बाबतीत हा चित्रपट अजय देवगन आणि सैफ अली खान यांच्या करिअरमधील सर्वोत्कृष्ट चित्रपट मानला जातो.