दाक्षिणात्य चित्रपट इंडस्ट्रीतील (Southern Film Industry) नामवंतर दिग्दर्शक आणि छायाचित्रकार के व्ही आनंद ( KV Anand ) यांचे निधन (KV Anand Passes Away ) झाले आहे. ते 54 वर्षांचे होते. आज पहाटे (30 एप्रिल) 3 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. प्राप्त माहितीनुसार आनंद यांना कार्डियाक अरेस्ट (Cardiac Arrest) आला. त्यामुळे त्यांचे निधन झाले. छातीत दुखू लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. केवी आनंद यांच्या अचानक जाण्याने तामिळ चित्रपटसृष्टी (Tamil Film Industry) आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा झटका बसला आहे. आनंद यांना अॅक्शन थ्रिलर चित्रपटांसाठी ओळखले जात असे. त्यांनी Ayan आणि Anegan यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.
के व्ही आनंद यांनी आपल्या करिअरची सुरुवात छायाचित्र पत्रकारीतेतून (Photojournalism) केली होती. त्यानंतर त्यांनी प्रसिद्ध सिनेफोटोग्राफर पी सी श्रीराम यांच्यासोबत Gopura Vasalile, Meera, Devar Magan, Amaran आणि Thiruda Thiruda यांसारख्या गाजलेल्या चित्रपटासाठी सहाय्यक म्हणून काम केले. पी सी श्रीराम यांनीच 1994 मध्ये त्यांचे नाव मल्याळम फिल्म Thenmavin Kombath साठी पुढे केले. एक सिनेमैटोग्राफर म्हणून त्यांचा हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटासाठी के व्ही आनंद यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film Award) मिळाला. (हेही वाचा, Irrfan Khan जगाचा निरोप घ्यायच्या आधी कोरोना रुग्णांसाठी 'अशी' केली होती मदत, मात्र जगापासून लपवायची होती ही गोष्ट)
सन 2005 मध्ये आलेल्या Kana Kandaen चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. 2008 मध्ये त्यांचा Ayan हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट एक एंटरटेनर फिल्म होती. महत्त्वाचे म्हणजे हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय झाला. यात अभिनेता सुर्या आणि तमन्ना प्रमुख भूमिकेत होते. या चित्रपटाने कमाईचा विक्रम केला.
Shocking ... i can’t believe this... RIP sir 💔💔💔💔 pic.twitter.com/MEwlzL9vwu
— aishwarya rajesh (@aishu_dil) April 30, 2021
दरम्यान, केवी आनंद यांनी बॉलिवुडमधीलही काही चित्रपटांसाठी सिनेमैटोग्राफर म्हणून काम केले आहे. त्यांनी 'डोली सजा के रखना', 'जोश, नायक-द रियल हीरो', 'द लीजेंड ऑफ भगत सिंह' आणि 'खाकी' यांसारख्या बॉलिवडू चित्रपटांसाठी त्यांनी काम केले. ते Indian Society of Cinematographers च्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.
Deepest condolences.... 🙏🏼
Rest in Peace KV Anand sir... pic.twitter.com/MUohDakROZ
— karthik subbaraj (@karthiksubbaraj) April 30, 2021
30 ऑक्टोबर 1966 मध्ये चेन्नई येथील पार्क टाऊन येथे जन्मलेल्या आनंद यांनी चेन्नई येथूनच शिक्षण घेतले. शिक्षण घेत असतानाच त्यांनी चित्रपटांमध्ये काम सुरु केले. त्यांच्या निधनामुळे सोशल मीडियावर त्यांचे चाहते भावूक पोस्ट शेअर करत दु:ख व्यक्त करत आहेत.