
बॉलिवूड मध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला स्टार किड तैमुर अली खान (Taimur Ali Khan) आज एका वेगळ्याच अंदाज पहायला मिळाला आहे. करिना कपूर खान आणि सैफ अली खानचा चिमुकला तैमुर आज त्याच्या वांद्रे येथील घराजवळ नंदी बैलाचा आशिर्वाद घेताना पहायला मिळाला आहे. ऑरेंज शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट आणि सुपर मॅनच्या मास्क मधील तैमुरचा आजचा अंदाज त्याच्या इतर फोटोंपेक्षा वेगळा होता. मुंबईत पॅपराझी आणि टीम चं एक खास नातं आहे. टीम पॅपराझींना पाहून इन्स्ट्रक्शन देताना मागील काही दिवसांत पहायला मिळाला आहे. इतरांपेक्षा त्याचा कॅमेर्यासमोरील बिनधास्त अंदाज सोशल मीडियात खूपच चर्चेचा विषय असतो. Taimur Ali Khan: फोटो काढणा-या मिडियावर भडकला तैमूर अली खान, 'या' शब्दांत दिली सक्त ताकीद, Watch Video.
दरम्यान तैमुर काल देखील मकर संक्रांती दिवशी पतंगाचा आनंद लूटताना दिसला. यापूर्वी करिनाने शेअर केलेल्या फोटोमध्येही तो कधी चारा उचलताना तर कधी मातीचं भांडं घडवताना दिसला होता. Taimur Ali Khan Cute Photos: वडील सैफ अली खान सोबत शेती करताना दिसला तैमूर; पहा क्यूट फोटोज.
तैमूर अली खानचा अंदाज



नंदी बैलाच्या मालकाने दिला आशिर्वाद
View this post on Instagram
दरम्यान यावेळेस नंदीबैलाच्या मालकाने तुझ्या सार्या 'पनवती' दूर होतील असा आशिर्वाद देखील त्याला दिला. नंतर तैमुरने कुतुहलाने सारं पाहत नंदीबैलाला नमस्कार देखील केला.
सध्या करीना कपूर खान गरोदर आहे. फेब्रुवारी 2021 म्हणजे पुढच्याच महिन्यात तिची प्रसुती होण्याची शक्यता आहे. त्याआधी करिना मागील काही दिवस तिच्या गर्ल गॅंग सोबत मज्जा-मस्ती करतानाचे फोटो सोशल मीडियात वायरल झाले होते.