MNS Impact: पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम चे गाणे युट्यूबला अपलोड केल्याप्रकरणी मनसेने दिलेल्या इशा-यांनतर T-Series ने मागितली जाहीर माफी
Amey Khopkar And Bhushan Kumar (Photo Credits: Instagram)

टी सिरीजचे मालक भूषण कुमार (Bhushan Kumar) आणि गायक सोनू निगम यांचा वाद चांगलाच पेटला असून आता भूषण कुमारांना मनसेच्या रोषाला देखील सामोरे जावे लागतय. टी-सीरिजने पाकिस्तानी गायक आतिफ अस्लम (Atif Aslam) याचे एक गाणे युट्यूबला अपलोड केल्यानंतर मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी आक्षेप दर्शविला होता. तसेच अमेय खोपकर यांनी फेसबुकच्या माध्यमातून हे गाणं तात्काळ हटविण्याची मागणी केली होती. यावर प्रतिक्रिया देत भूषण टी-सिरीज कंपनीने मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना लेखी स्वरुपात पत्र लिहून माफी मागितली आहे.

टी-सीरिज ने युट्यूबवर अपलोड केलेल्या पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमच्या गाण्यानंतर अमेय खोपकर यांनी "भूषण कुमार तू याला धमकी समज, पण जर तू या गोष्टी बंद केल्या नाहीस तर तुला खूप महागात पडेल" असा कडक शब्दांत मनसे स्टाईलने दिला होता. त्याचा परिणाम स्वरुप टी-सीरिजने माफी मागणारे पत्र राज ठाकरे यांना पाठविले आहे. माझ्या नादी लागलास तर, मरीना कंवरचा व्हिडीओ युट्यूब चॅनलवर पब्लिश करील; गायक सोनू निगम यांचा भूषण कुमार ला इशारा

पाहा ट्विट

“हे गाणं आमच्या प्रमोशन टीमच्या एका कर्मचाऱ्याने टी-सीरिजच्या युट्यूब चॅनेलवर रिलीज केलं होतं. त्याला माहिती नसल्याने ही चूक झाली. याबद्दल आम्ही माफी मागतो आणि यापुढे हे गाणं टी-सीरिजच्या युट्यूब चॅनेलवर रिलीज किंवा प्रमोट करणार नाही अशी खात्री देतो,” अशी हमी टी-सीरिजने दिली आहे. या पत्रात त्यांनी यापुढे पाकिस्तानी कलाकारांना कोणत्याही बाबींमध्ये सहाय्य करणार नाही याची खात्रीही दिली आहे.