Video : दुर्गापूजेत सुष्मिता सेनचा मुलींसोबत पारंपरिक नृत्याविष्कार
सुष्मिता सेन (Photo Credit : Instagram)

देशभरात नवरात्रीची धूम आहे. देवीच्या भक्तीत देशवासिय तल्लीन झाले आहेत. यात बॉलिवूड कलाकारही मागे नाहीत. बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनने दुर्गापूजा केली आणि त्याचबरोबर एक पारंपरिक नृत्याविष्कारही सादर केला. सुष्मिताचा हा डान्स सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अभिनेत्री सुष्मिता सेन आपल्या मुली रिनी आणि अलिशासोबत दुर्गापूजा करताना दिसत आहे. त्यानंतर तिचा नृत्याविष्कार पाहायला मिळत आहे.

सुष्मिता सेन गोल्डन साडीत अतिशय सुंदर दिसत आहे. तिच्या मुलीही पारंपारीक वेशात दिसत आहेत. हातात कुंड घेऊन सुष्मिता आपल्या मुलीला नृत्य शिकवत आहे.

तुम्हीही पाहा हा डान्स व्हिडिओ...

सुष्मिता सेन गेल्या काही काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर भलतीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियावर फोटोज आणि व्हिडिओज शेअर करत असल्याने ती चर्चेत असते. त्याचबरोबर अलिकडेच सुष्मिता एका मॉडेलला डेट करत असल्यानेही चर्चेत आहे.