सुष्मिता सेन 'या' मॉडेलला करतेय डेट
प्रातिनिधीक फोटो ( फोटो सौजन्य - गुगल)

सिनेसृष्टीतल्या कलाकारांचे चित्रपटातील पडद्यावरील आयुष्य ते खासजी आयुष्य याची चाहत्यांना नेहमीच उत्सुकता लागलेली असते. त्यामुळे सध्या रुपेरी पडद्यावरील सुष्मिता सेन ही एका मॉडेलला डेट करत असल्याची चर्चा सर्वत्र चालू आहे. तसेच एका फॅशन शोच्या दरम्यानसुद्धा या दोघांना प्रेक्षकांनी एकत्र पाहिले आहे.

यापूर्वीची मिस युनिवर्सचा मान पटकवलेली आणि सिनेसृष्टीतल्या आपल्या  अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी  सुष्मिता सेन रॉमन शॉल या मॉडेलला डेट करत असल्याच्या चर्चा सर्वत्र रंगत आहे. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुष्मिताने आपल्या या नात्याबद्दल फारसे मिडियासमोर उघड केले नसल्याचे सांगितले आहे. तसेच दोन महिन्यांपूर्वी सुष्मिता आणि रॉमन शॉल या दोघांची एका फॅशन शोच्या दरम्यान भेट झाली होती. तेव्हा पासून सुष्मिता आणि रॉमन एकमेकांना काही ना काही कारणांसाठी सतत भेटत असल्याचे समोर येत आहे. तर सुष्मिताच्या दोन्ही मुलींसोबत रॉमनचे संबंध चांगले जुळले आहेत.

परंतु हे दोघे आपल्या नात्याची कबुली केव्हा देत आहेत याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तर सुष्मिताला आपला नवा जोडीदार रॉमेन मिळाल्याने तिच्या चाहत्यांमध्ये आनंद पाहायला मिळत आहे.