Sushant Singh Rajput Death Case: सुशांतच्या घरी 13 जूनला कोणतीही पार्टी झालीच नव्हती; सीबीआयच्या चौकशीत माहिती समोर
Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा (Sushant Singh Rajput Death Case) तपास सीबीआय (CBI) करत आहे. सुशांत मृत्यूप्रकरण गेल्या 2 महिन्यांपासून प्रसारमाध्यमांत झळकत आहेत. तसेच सुशांतच्या मृत्यूच्या रात्री त्याच्या घरात पार्टी सुरु होती, अशीही माहिती समोर आली होती. मात्र, सुशांतच्या मुंबईच्या (Mumbai) वांद्रे येथील शेजारी राहणाऱ्या एका महिलेने याबाबत मोठा खुलासा केला आहे. सुशांतच्या घराची लाईट 13 जूनला रात्री 10.30 ते 10.45 च्या दरम्यान बंद होती. महत्वाचे म्हणजे, त्याच्या घरी कोणतीही पार्टी नव्हती असा दावाही संबंधित महिलेने केला आहे.

सीबीआयचे एक पथक आज दुपारी 2 वाजून 25 मिनिटांनी अभिनेता सुशांतच्या घरी पोहचली होती. तसेच फॉरेन्सिक एक्सपर्टचे एक पथक आणि मुंबई पोलिसांचे एक पथक त्या ठिकाणी उपस्थित होते. याशिवाय, सीबीआयने सिद्धार्थ पिठानी, दिपेश आणि नीरज यांनाही सोबत आणले होते. मुंबईत पोहोचल्यानंतर सुशांत सिंह प्रकरणातील सीबीआयच्या पथकाच्या तपासाचा आज दुसरा दिवस आहे. हे देखील वाचा- Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबईत येणाऱ्या सीबीआयच्या पथकासाठी मुंबई महानगरपालिकेची महत्वाची सूचना

एएनआयचे ट्वीट- 

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा (Sushant Singh Rajput Death Case) तपास सीबीआयकडे (CBI) सोपवण्यास सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी महत्वपूर्ण निकाल दिला होता. याव्यतिरिक्त सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले होते.