Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणी शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा याला NCB कडून दोन तासात अटक केली जाणार
Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या मृत्यूप्रकरणी दिवसागणिक नव्याने खुलासे होत आहेत. सुशांतच्या मृत्यूच्या प्रकरणी आता ड्रग्ज संबंधित जोडले गेल्याने या मध्ये सामील असलेल्या प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. याच दरम्यान आता सीबीआय नंतर एनसीबी (Narcotics Control Bureau) यांच्याकडून रिया चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, शौविक चक्रवर्ती यांची ड्रग्ज संदर्भात चौकशी केली जात आहे. याच दरम्यान आता काही वेळापूर्वी एनसीबी यांच्याकडून कैझान इब्राहिम याला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आता शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना दोन तासात अटक केली जाणार आहे. या अटकेपूर्वी औपचारिक प्रक्रिया सुरु असल्याचे ही एनसीबी यांनी स्पष्ट केले आहे.

एनसीबी मधील DY DG मुथुआ अशोक जैन यांनी असे म्हटले आहे की, अद्याप अटक करण्यात आलेली नाही. आम्ही त्यांच्याशी बोलत असून पुरावे जमा करत आहोत. त्यामुळे या संदर्भात जेव्हा आम्ही काही कारवाई करु त्यावेळी सांगू असे ही त्यांनी शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना अटक करण्यापूर्वी म्हटले आहे.(Sushant Singh Rajput Death: सुशांंत सिंह राजपूत ने स्वतः एका मुलाखतीत Claustrophobia असल्याची दिली होती कबुली, पहा हा Viral Video)

 Tweet: 

Tweet:

दरम्यान, आज सकाळीच सीबआयचे पथक रिया हिच्या घरी पोहचले होते. तर सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंह यांनी सुशांतचा खून झाला असल्याची शंका उपस्थित केली आहे. विकास सिंह म्हणाले आहेत की, या प्रकरणात आतापर्यंत आम्ही आत्महत्येचा गुन्हा दाखल केला होता, पण आता आम्हाला वाटते की सुशांतचा खून झाला आहे. सुशांत प्रकरणात सीबीआय आत्महत्येच्या प्रकरणातून चौकशी करत आहे. ही आत्महत्या नसून हत्या असल्याची शंका सुशांतच्या कुटुंबालाही असल्याचे सिंह यांनी सांगितले आहे.