Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी करण जोहर, सलमान खान, संजय लीला भन्साळी, एकता कपूर यांच्यासमवेत 8 जणांविरोधात मुजफ्फरपूर कोर्टात तक्रार दाखल
Sushant Singh Rajput, Karan Johar, Salman Khan (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होऊ लागले आहे. सुशांतच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, बॉलिवूडच्या काही मंडळींनी त्याला बॅन केल्यामुळे सुशांतने टोकाचे पाऊल उचलले आहे असे सध्या बोलले जात आहे. सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येवरुन अनेक तर्कवितर्क लावले जात असताना एक नवे अपडेट समोर येत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan), निर्माता करण जोहर (Karan Johar), संजय लीला भन्साली आणि एकता कपूर (Ekta Kapoor) यांच्यासह 8 जणांविरुद्ध बिहारच्या मुज्जफरपूर (Muzaffarpur) येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण स्थानिक वकील सुधार कुमार ओझा यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

न्युज एजेंसी ANI ने दिलेल्या माहितीनुसार, "मी बिहार मधील मुज्जफरपूर येथील एका न्यायालयात अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कलम 306, 109, 504 आणि 506 अंतर्गत करण जोहर, संजय लीला भन्साली, सलमान खान आणि एकता कपूर यांच्यासह 8 जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे.- वकील सुधीर कुमार ओझा." ('सलमान खान आणि कुटुंबाने माझ्या करिअरची वाट लावली, पण आता शांंत बसणार नाही' दबंग सिनेमाचा दिग्दर्शक अभिनव कश्यप याची धक्कादायक Facebook Post)

ANI Tweet:

आयपीसी कलमानुसार, एकता कपूर, संजय लीला भंसाली, करण जोहर आणि सलमान खान यांच्यासमवेत इतर काही जणांविरोधात सुशांतला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याबद्दल आणि त्याला वाईट वागणूक दिल्याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यांना शिक्षा व्हावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

सुशांतला बॉयकॉट करत त्याच्याकडून 7 सिनेमे काढून घेण्यात आले होते अशी चर्चा देखील सुशांतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर रंगत आहे. दरम्यान सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा व्यावसायिक दृष्टीनेही तपास केला जाईल असे महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले आहे.