Sushant Singh Rajput Case: सुशांतचा मॅनेजर Samuel Miranda, रियाचा भाऊ Showik Chakraborty ला NCB कडून समन्स; सॅम्युअल मिरांडा ताब्यात
Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) मृत्यू प्रकरणी ड्रग्ज कनेक्शनचा तपास करण्यासाठी सध्या NCB ची टीम मुंबईमध्ये दाखल झाली आहे. आज सकाळी या टीमकडून सुशांतचा मॅनेजर Samuel Miranda, रियाचा भाऊ Showik Chakraborty यांच्या घरी छापा टाकून झाडाझडती केल्यानंतर दोघांनाही समन्स बजावत ताब्यात घेण्यात आले आहे. आता त्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. दरम्यान एनसीबीच्या टीमकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार आज सकाळी NDPS Act अंतर्गत छापा टाकण्यात आला आहे. Narcotic Drugs and Psychotropic Substances Act, 1985 अंतर्गत सॅम्युअल मिरांडाला ताब्यात घेण्यात आल्याचं सांगण्यात आले आहे.

दरम्यान मुंबईमध्ये यापूर्वी उच्चभ्रूंना ड्रग्सचा पुरवठा करण्याचा प्रकरणामध्ये चार जणांना अटक झाली आहे. ही कारवाई NCB कडून करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी रिया, शौविक यांच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅट्सची तपासणी झाली होती. त्याच्यामध्ये ड्रग्ज कनेक्शनचे धागेदोरे मिळाले होते. तसेच ईडीच्या चौकशीमध्येही त्याचे संदर्भ आल्याने आता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला वळण मिळाले आहे.

ANI Tweet

दरम्यान मुंबईमध्ये ड्रग्ज तस्करीत ताब्यात असलेल्यांपैकी एकाने सॅम्युअल मिरांडाचं नाव घेतलं आहे. ANI वृत्त संस्थेच्या माहितीनुसार, सॅम्युअल शौविकच्या आदेशावरून ड्रग्जची जुळवाजुळव करत होता.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये रिया सुशांतचा विष देत होती. तिच खुनी आहे असा आरोप देखील केला आहे. सध्या सीबीआय सोबतच  ईडी आणि एनसीबी या केंद्रीय तपास यंत्रणा सुशांंतच्या मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी काम करत आहेत. तर मुंबई पोलिस  त्यांना मदत करत आहे.