सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी संजय लीला भंसाली यांची चौकशी होणार; मुंबई पोलिसांनी पाठवला समन्स
संजय लीला भंसाली (Image Credit: IANS)

अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) ने 14 जून दिवशी आपल्या वांद्रे येथील घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आता त्याच्या मृत्यूनंतर आत्महत्येचे गुढ उकलण्यासाठी पोलिस तपास सुरू झाला आहे. आत्तापर्यंत 12 पेक्षा अधिक लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या यादीमध्ये आता सिनेदिग्दर्शक संजय लीला भंसाली (Sanjay Leela Bhansali) यांचा देखील समावेश झाला आहे. संजय लीला भंसाळींना समन्स पाठवण्यात आला असून जाबाब नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले आहे. टाईम्स नाऊच्या वृत्तानुसार, दिग्दर्शक संजय लीला भंसाळी यांना पोलिस तपासासाठी नोटिस बजावण्यात आली आहे. सुशांत सिंह राजपूत याची 'दिल बेचारा' सिनेमातील को-स्टार संजना संघी हिने सोडली मुंबई; पहा पोस्ट.

मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, संजय लीला भंसाळी यांनी सुशांत सिंह राजपूत याला त्यांच्या बाजीराव मस्तानी आणि रासलीला राम-लीला या दोन सिनेमांची ऑफर दिली होती. मात्र हे सिनेमे यशराज बॅनरचे असल्याने त्याला सिनेमांपासून लांब ठेवण्यात आले होते. सुशांत सिंग राजपूतला सिनेमे ऑफर होत होते मात्र शेवटच्या क्षणी ते त्याच्या हातातून निसटतही होते.

सुशांत सिंह राजपूतचा अंतिम पोस्टमार्टम आता समोर आला आहे. सुशांतच्या मृत्यूचं कारण त्याचा श्वास रोखल्याने झाल्याचं सांगण्यात आलं आहे. हा रिपोर्ट 5 डॉक्टरांच्या टीमने बनवला आहे. दरम्यान सुशांतच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे विष, केमिकल नसल्याचंदेखील स्पष्ट झालं आहे.

दरम्यान सुशांत सिंग राजपूत हा बिहारचा असून कलाक्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी आला होता. त्याच्या करियरला हिंदी टेलिव्हिजन वर पवित्र रिश्ता मालिकेतून दिशा आणि ओळख मिळाली. त्यानंतर बॉलिवूडमध्येही त्याने अनेक दर्जेदार सिनेमे केले. मागील काही महिन्यांपासून तो नैराश्यावर उपचार घेत असल्याचेही समोर आले आहे.