Rhea Chakraborty confesses to drug chat (PC - Twitter)

Sushant Singh Rajput Case: सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाची (Sushant Singh Rajput Case) चौकशीमध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशातंच सुशांतची बहिण किर्ती सिंह (Kirti Singh) हिने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) च्या ड्रग चॅटिंगचे काही स्क्रीनशॉट शेअर केले आहेत.

दरम्यान,  या चॅटिंगमध्ये रियाकडून ड्रगची मागणी करण्यात आली आहे. या चॅटींगमध्ये रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक चक्रवर्ती doobie ऑर्डर करत आहेत. गूगल सर्चनुसार ही एक गांजाची सिगारेट असते. श्वेताने शेअर केलेले स्क्रीनशॉट्स गेल्या 30 जुलै 2019 मधील आहेत. यात रिया डूबी ऑर्डर करताना दिसत आहे. तिने लिहिले की, डूबीची गरज आहे. यावर उत्तर आलं की, घेऊन येत आहे. यावर आयुषचा मेसेज आहे की, रोल करत आहे. यादरम्यान, सिद्धार्थ पिठानीचा मेसेज येतो की मिरांडा आला आहे. (हेही वाचा - Sushant Singh Rajput Case: सुशांतची बहिण श्वेता सिंह किर्ति ने रिया चक्रवर्तीला विचारला प्रश्न, म्हणाली पैसे नाहीत तर देशातील सर्वात महागडा वकिल कसा नियुक्त केलास?)

What are we to conclude?? #ArrestCulpritsOfSSR pic.twitter.com/YZcg9u3yKI

या चॅटिंगचे स्क्रीनशॉट सुशांत सोबत काम करणाऱ्या NIFW नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमधील आहेत. या ग्रुपमधे आयुष, आनंदी, सिद्धार्थ पिठानी, सॅम्युअल मिरांडासहीत रिया आणि इतर काही सदस्य आहेत. यात एकाने SSR ला डूब मिळालं आहे ना? असा प्रश्नदेखील विचारला आहे. त्यामुळे या चॅटिंगमध्ये सामील असणाऱ्या सर्वांची सीबीआय चौकशी करण्याची शक्यता आहे.