सनी लिओनीच्या 'Madhuban' या गाण्यावरून निर्माण झाला वाद, गाण्यावर बंदी घालण्याची साधूसंताची मागणी
Sunny Leoni (Photo Credit - Youtube)

सनी लिओनीला (Sunny Leoni)  बॉलिवूडमधील सर्वात हॉट हिरोईन मानले जाते. सनी लिओनी कधी तिच्या सौंदर्याने, कधी तिच्या साधेपणाने तर कधी तिच्या हॉटनेसने सर्वांची मनं जिंकते. बॉलिवूडची हॉट अभिनेत्री सनी लिओनी पुन्हा एकदा वादात सापडली आहे. यावेळी ती तिच्या मधुबन (Madhuban) गाण्यामुळे वादात सापडली आहे. मधुबन हे गाणे रिलीज होताच त्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली होती. सनी लिओनीचे मधुबन हे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे, जे कनिका कपूर (Kanika Kapoor) आणि अरिंदम चक्रवर्ती (Arindam Chakraborty) यांनी गायले आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर त्यावरून बराच वाद सुरू झाला आहे. या गाण्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप सांधूसंत आणि पुरोहितांनी केला आहे.

गाण्यावर बंदी घालण्याची मागणी

या गाण्यावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी काही पंडित आणि साधुसंत करत आहेत. या गाण्यावर लवकरात लवकर बंदी घातली नाही तर आंदोलन करू, असे त्यांचे म्हणणे आहे. वृंदावनचे संत नवल गिरी महाराज यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, जर सरकार अभिनेत्रीवर कोणतीही कारवाई करणार नाही आणि त्याचवेळी या गाण्यावर बंदी घालणार नाही तर आम्ही न्यायालयात जाऊ. जर सनी लिओनीने या गाण्यातून तिचा सीन हटवला नाही तर तिला भारतात राहू देऊ नये, असेही म्हणाला. (हे ही वाचा Gadar 2: सनी देओलने शेअर केला 'गदर 2' मधील तारा सिंगचा फर्स्ट लूक.)

याशिवाय अनेक पंडित आणि संत या गाण्याच्या विरोधात उभे ठाकले असून मधुबन नावाच्या गाण्यात सनी लिओनीने केलेला बोल्ड डान्स चुकीचा असल्याचे त्यांचे मत आहे. यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे त्यांचे म्हणणे आहे.