अरबाज खान ह्याच्या कार्यक्रमात वाईट प्रश्न विचारल्याने सनी लियोनीला रडू आवरले नाही
सनी लिओनी. (Photo Credits : Instagram)

अरबाज खान (Arbaaz Khan)  ह्याचे सध्या बॉलिवूडमधील करिअर अडचणींचा सामना करत पुढे जात आहे. मात्र एवढा सहतनेने अरबाज आपली हार मानणार नाही. त्यात नुकताच अरबाज खान ह्याने नवीन चॅट शो 'पिंच बाय अरबाज खान' (Pinch by Arbaaz Khan)सुरु केला आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अरबाज खूप असे मजेदार प्रश्न विचारताना दिसून आले. तर या शोमध्ये गेस्ट म्हणून अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) हिला बोलावण्यात आले होते. याबाबत खुद्द अरबाजने सोशल मीडिया अकाउंटवरुन चाहत्यांना माहिती दिली आहे.

या कार्यक्रमादरम्यान अरबाज विविध पद्धतीने प्रश्न उपस्थित करताना दिसून येत आहे. तर नुकतीच सनी लिओनी सुद्धा या कार्यक्रमाचा हिस्सा झाल्यानंतर अरबाज ह्याने तिच्या बद्दलचा अनुभव सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अमर उजाला यांनी दिलेल्या वृत्तानुसार, अरबाजने सनी हिला तिच्याबद्दल लोकांकडून देण्यात येणाऱ्या प्रितिक्रियांबद्दल विचारले. तसेच कार्यक्रमाच्या शूटिंग दरम्यान एका व्यक्तीने सनी हिला अत्यंत वाईट प्रश्न विचारल्याने तिला रडू कोसळले.

मात्र कोणता प्रश्न होता याबाबत अरबाजने सांगितले नाही. तसेच या कार्यक्रमासाठी आता पर्यंत करीना कपूर, सोनाक्षी सिन्हा, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि कपिल शर्मा सह अन्य कलाकारांनी उपस्थिती लावली होती.