‘Student Of The Year 2’ नवं गाणं ‘जट लुधियाने दा’ झाले प्रदर्शित
Student Of The Year song Photo Credit: YouTube

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित असलेल्या Student Of The Year 2(स्टुडंट ऑफ द इयर 2) ह्या चित्रपटातील नवीन गाणे ‘जट लुधियाने दा’(Jatt Ludhiyane Da) प्रदर्शित झाले आहे. ह्या गाण्यामध्ये तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांच्यात जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळतेय. त्याशिवाय ह्या गाण्यामध्ये अनन्या पांडे(Ananya Pandey) सुद्धा दिसतेय.

टायगर श्रॉफ पुन्हा एकदा आपल्या अफलातून डान्सने तरुणींना घायाळ करायला सज्ज झालाय. ज्यात तो तारा ला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. ह्या चित्रपटाचे निर्माते करण जोहर ने (Karan Johar) हे गाणे सोशल मिडियावर शेअर केले आहे. तसेच करणने ह्यात असेही म्हटले आहे की, “हे गाणे ऐकताच तुम्हाला नवा जोश, नवा उत्साह निर्माण होईल.” विशाख-शेखर (VIshal-Shekhar) ने ह्या गाण्याला संगीत दिले असून अंविता दत्त ने हे गाणे लिहिले आहे. तर विशाल ददलानी आणि पायल देव यांनी हे गाणे गायिले आहे.

Student Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

ह्याआधीही ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ ची बरीच गाणी रिलीज झाली आहेत. तसेच त्याचा ट्रेलर ही प्रदर्शित झाला आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन पुनीत मल्होत्रा (Punit Malhotra) यांनी केले आहे. ही फिल्म 2012 मध्ये आलेल्या स्टुडंट ऑफ द इयर ह्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा चित्रपटाचे स्वत: करण जोहरने दिग्दर्शन केले होते.