Student Of The Year 2 The Jawaani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!
The Jawaani Song from Student of the Year 2 (Photo Credits: YouTube/Zee Music Company)

SOTY2 Yeh Jawaani Hai Deewani Song: 'स्टुडेंट ऑफ द ईअर 2' (Student of the Year 2) या सिनेमातील पहिले वहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. किशोर कुमार यांचे 'ये जवानी है दिवानी' (Yeh Jawaani Hai Deewani) या गाण्याचे हे रिक्रिएडेट व्हर्जन आहे. 1972 साली आलेल्या 'जवानी दिवानी' सिनेमात हे गाणे अभिनेता रणधीर कपूर आणि जया बच्चन यांच्यावर चित्रित झाले होते. आता या लोकप्रिय गाण्याच्या नव्या व्हर्जनमध्ये टायगर श्रॉफ (Tiger Shroff), तारा सुतारिया (Tara Sutaria) आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) हे त्रिकूट दिसत आहे. टायगर श्रॉफच्या हटके डान्स स्टाईलने गाणे अधिकच खुलले आहे. तर तारा आणि अनन्या या दोघींनीही चांगली साथ दिल्याने तिघांची केमिस्ट्री जबरदस्त जमली आहे. (अनन्या पांडे, तारा सुतारिया, टायगर श्रॉफ च्या SOTY2 ट्रेलर नंतर सोशल मीडियात मिम्सचा पाऊस)

करण जोहर याने गाणे प्रदर्शित होण्यापूर्वी गाण्याची एक क्लिप शेअर केली. यात 'गिली गिली अक्खा' म्हणजेच 'ये जवानी है दीवानी' या गाण्याची झलक पाहायला मिळाली होती.

करण जोहर याचे ट्विट:

धर्मा प्रॉडक्शनचा अजून एक सिनेमा 'स्टुडेंट ऑफ द ईअर 2' बद्दल प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. गेल्या आठवड्यात सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. तारा सुतारिया आणि अनन्या पांडे या दोन्ही अभिनेत्री या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहेत. पहा सिनेमाचा ट्रेलर

पहा गाण्याचा व्हिडिओ:

2012 मध्ये आलेल्या 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातून आलिया भट्ट, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

'स्टुडेंट ऑफ द ईअर 2' या सिनेमाचे दिग्दर्शन पुनीत मल्होत्रा करत असून हा सिनेमा 10 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.