आलिया भट्ट (फोटो सौजन्य-ट्वीटर)

स्टुडेंट ऑफ द ईअर 2 (SOTY 2) या आगामी बॉलिवूड चित्रपटाबद्दल प्रेक्षकांना फार उत्सुकता लागली असून त्याच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. तर काही दिवसांपूर्वी या सिनेमातील मुंबई दिल्ली दी कुडियां हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. त्यानंतर आता या चित्रपटातून झकळणारी अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

आलिया भट्ट ही टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याच्यासोबत एका आयटम सॉन्गमधून दिसून येणार आहे. त्याबद्दल आज त्याचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. या लूकमध्ये आलियाने पर्लपल रंगाचा ड्रेस घातलेला दिसून येत आहे. परंतु आलियाचे हे गाणे फराह खान हिने कोरिओग्राफ केले असल्याचे सांगण्यात येत आहे.

तसेच टायगर याने ट्वीटरवर ट्वीट करत असे म्हटले आहे की, आलियासोबत काम केल्यानंतर उत्तम अनुभव आला. तसेच यापूर्वी अशा पद्धतीचा डान्स केला नाही.(Student of the Year 2 Song Mumbai Dilli Ki Kudiyaan: SOTY 2 सिनेमातील 'मुंबई दिल्ली दी कुडियां' हे धमाकेदार गाणे प्रदर्शित)

या सिनेमात टायगर व्यतिरिक्त अनन्या पांडे आणि तारा सुतारिया देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. 201 मध्ये स्टुडंट ऑफ द ईयरमधून आलिया भट्टने आपल्या करिअरला सुरूवात केली होती. या सिनेमात तिच्यासोबत वरूण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा सुद्धा दिसले होते.