Student of the Year 2 Song Mumbai Dilli Ki Kudiyaan: SOTY 2 सिनेमातील 'मुंबई दिल्ली दी कुडियां' हे धमाकेदार गाणे प्रदर्शित
Tiger Shroff, Ananya Panday, Tara Sutaria in Mumbai Dilli Ki Kudiyaan song from SOTY 2. (Photo Credits: YouTube)

SOTY 2 Mumbai Dilli Di Kudiyaan Song: स्टुडेंट ऑफ द ईअर 2 (Student Of The Year 2) सिनेमातील नवीन गाणे 'मुंबई दिल्ली दी कुडियां' (Mumbai Dilli Di Kudiyaan) प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात टायगर श्रॉफ (Tiger Shroff), अनन्या पांडे (Ananya Pandey)आणि तारा सुतारिया (Tara Sutaria)यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. उडत्या चालीचे हे गाणे तरुणाईला थिरकण्यास भाग पाडेल. देव नेगी, पायल देव आणि विशाल ददलानी यांनी या गाण्याला आवाज दिला असून विशाल-शेखर यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे.

करण जोहर याने ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत करण जोहरने लिहिले की, येथे तापमान वाढवण्यासाठी... मुंबई दिल्ली की कुडियां हे गाणे आता रिलिज केले आहे. 'स्टुडेंट ऑफ द ईअर' सिनेमातील पहिलेवहिले 'ये जवानी है दिवानी' गाणे प्रेक्षकांच्या भेटीला!

करण जोहर ट्विट:

पहा व्हिडिओ:

यापूर्वी सिनेमाचा ट्रेलर आणि एक गाणे प्रदर्शित झाले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन पुनीत मल्होत्रा यांनी केले असून धर्मा प्रॉडक्शन या सिनेमाची निर्मिती करत आहे. हा सिनेमा 10 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.