देशात सध्या महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेबाबतचा सरकार कधी तोडगा काढणार याबद्दल सर्व महिला वाट पाहत आहे. तर बॉलिवूड अभिनेता अभय देओल (Abhay Deol) याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्यामध्ये #standupforyourself हॅशटॅग वापरत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित केला आहे.
अभय देओल याने इन्स्टाग्रावरील पोस्ट केलेल्या व्हिडिओखाली कॅप्शन देत असे म्हटले आहे की, एखद्या महिलेसोबत अन्याय झाल्यास त्याच्या बद्दल जगजाहिरपणे सांगण्यासाठी खुप धैर्य लागते. त्यामुळे शिल्पकार दुर्गा गावडे (Durga Gawade) हिच्यासोबत घडलेल्या घटनेचा किस्सा त्याने येथे उघड केला आहे. दुर्गा ही गोव्यात बाईकवरुन जात असताना तिच्यासोबत ब्रॅयन फ्रान्सको नावाच्या वक्तीने तिच्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या बाईकला क्रॅश करुन पुढे जात शिवीगाळ सुद्धा केली. तसेच दुर्गा हिच्यासोबत गैर वर्तन करत तिचा मोबाईलसुद्धा फेकून दिला. या प्रकरणी दुर्गा हिने मोठ्या धैर्याने ब्रॅयन याला जोरदार कानशिलात लगावत त्याने केलेल्या कृत्याचे प्रतिउत्तर दिले आहे.
मात्र ब्रॅयन याला गोव्यातील पोलिसांनी या प्रकरणानंतर तुरुंगात टाकले होते. मात्र ब्रॅयन याचा जामीन मिळाल्याने तो सूटला असल्याचे अभयने म्हटले आहे. मात्र अशा व्यक्तिंच्या विरोधात कारवाई करण्यात यावी असे सुद्धा अभयने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. महिलांच्या बाबत अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. मात्र या प्रकारावर अद्याप कोणीही उघडपणे बोलण्यास तयार नसल्याचे चित्र दिसून येते.