बॉलिवूड मधील दिग्गज दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) यांचा मृत्यू होऊन जवळजवळ एका वर्षापेक्षा अधिक काळ झाला आहे. परंतु आजवर सुद्धा श्रीदेवी यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. तर आता 'मदर्स डे' (Mother's Day) च्या निमित्ताने पुन्हा एकदा श्रीदेवी यांच्या एका अनोख्या अंदाजात आठवणी जाग्या करण्यात येणार आहेत. श्रीदेवी यांचा शेवटचा चित्रपट 'मॉम' (MOM) आता चायना (China) मध्ये येत्या मदर्स डे दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे.
'मॉम' या चित्रपटातून श्रीदेवी यांच्या अभिनयाचे फार कौतुक करण्यात आले. तसेच या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर सुद्धा बक्कळ कमाई केली होती. तर आता चायना मध्ये मॉम चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे ट्रेंन्ड अॅनालिस्ट कोमल नहाटा यांनी ट्वीट करुन याबद्दल माहिती दिली आहे.
On the occasion of Mother's Day, Zee Studios International will now release late Sridevi's critically-acclaimed film #Mom on May 10 in China. pic.twitter.com/UIp09QVyu8
— Komal Nahta (@KomalNahta) April 4, 2019
या चित्रपटाला नॅशन अवॉर्ड देण्यात आला आहे. तर बॉलिवूडसह 300 पेक्षा जास्त विविध भाषांमध्ये श्रीदेवी यांनी काम केले होते. त्याचसोबत भारत सरकारकडून सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून श्रीदेवी यांचे नाव घोषित करण्यात आले होते.