Sridevi & Boney Kapoor (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडची 'चांदनी' श्रीदेवी (Sridevi) यांनी जगाला निरोप देऊन वर्ष सरत आलं. 24 फेब्रुवारी 2019 ला श्रीदेवी यांचा पहिला स्मृतीदिन आहे. या निमित्ताने बोनी कपूर (Boney Kapoor) यांनी श्रीदेवींच्या साड्यांचा लिलाव (Saree Auction) करण्याचे ठरवले आहे. लिलावाच्या पैशातून गरजवंतांना मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

श्रीदेवींच्या कोटा साड्यांचा (Kota Saree) ऑनलाईन लिलाव करण्यात येईल. या साड्या 'पारिसेरा' नावाच्या वेबसाईटवर उपलब्ध असतील. या वेबसाईटवरुन तुम्ही तुमच्या पसंतीची साडी खरेदी करु शकता. साड्यांच्या लिलावाची सुरुवात 40,000 पासून सुरु होणार आहे. लिलावासाठी उत्सुक असलेल्या अनेकांनी यात सहभाग घेतला आहे. 1,25,000 पर्यंत साड्यांवर बोली लावली जात आहे.

 

View this post on Instagram

 

Adore this look on Sridevi😍 The colors + jewelry are stunningly pretty💖

A post shared by Fatima’s Sridevi Fanpage (@sridevikapoorx) on

ही साडी दक्षिण भारतीय श्रीदेवींची 'स्टाईल स्टेंटमेट' ठरली होती. भारतीय परंपरेची आठवण करुन देणारी ही साडी, अशी वेबसाईटवर याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

या लिलावातून मिळणारी रक्कम 'कंसर्न इंडिया फाउंडेशन प्रोग्राम'मध्ये पाठवण्यात येईल. ही संस्था अनाथ मुले, निराधार स्त्रिया, दिव्यांग यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक आणि इतर प्रकारची मदत करते.