Antim: Salman Khan सोबत 'अंतिम' चित्रपटात रोमांस करणार दाक्षिणात्य अभिनेत्री Pragya Jaiswal; पहा अभिनेत्रीचे Hot Photos
सलमान खान आणि प्रज्ञा जयस्वाल (Photo Credits: Instagram)

Antim: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आपल्या 'अंतिम' चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. महेश मांजरेकर दिग्दर्शित या चित्रपटात सलमान एका शीख पोलिस कर्मचाऱ्याची भूमिका साकारत आहे. तसेच त्याचा मेहुणा आयुष शर्मा या चित्रपटात एका गुंडाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी सलमान शनिवारी मुंबईत शूटिंग करताना दिसला. या चित्रपटासाठी दक्षिण सुंदरी प्रज्ञा जयस्वाल (Pragya Jaiswal) ला कास्ट करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

प्रज्ञा या चित्रपटात सलमानसोबत रोमांस करताना दिसणार असून मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रज्ञासाठी हा प्रकल्प खूप खास आहे. कारण या चित्रपटाद्वारे ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच, सलमान खानसारख्या सुपरस्टार्ससह बॉलिवूडमध्ये पाऊल टाकणे तिच्यासाठी अधिक फायदेशीर ठरू शकते. (वाचा - Salman Khan Shoots for Antim: 'अंतिम' चित्रपटाच्या सेटवरून लीक झाले सलमान खानचे 'हे' फोटो; पहा खास छायाचित्र)

मीडिया रिपोर्टनुसार, अंतिम चित्रपटासाठी प्रज्ञा सोबत महाबळेश्वरमध्ये शूटिंगही सुरू आहे. या चित्रपटात प्रज्ञाचे अभिनेत्यासह दोन रोमँटिक गाणीही सादर करण्यात येणार आहेत. यात ती सलमानच्या प्रियसीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pragya Jaiswal (@jaiswalpragya)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pragya Jaiswal (@jaiswalpragya)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pragya Jaiswal (@jaiswalpragya)

 

View this post on Instagram

 

A post shared by Pragya Jaiswal (@jaiswalpragya)

याशिवाय या चित्रपटात महिमा मकवाना आयुषची जोडीदार म्हणून दिसणार आहे. तसेच अंतिम चित्रपटात वरुण धवन कॅमिओच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटात वरुण गणपती गाण्यावर सलमान आणि आयुषसोबत डान्स करताना दिसू शकतो.