Sonu Sood बनला फिलिपाईन्स मध्ये अडकलेल्या भारतीयांचा आधार; विद्यार्थी व देशवासियांच्या घरवापसी साठी सुरु केली मोहिम
Sonu Sood (PC - Facebook)

कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाउन (Lockdown) लागु झाल्यापासुन फिल्म इंड्स्ट्री मधील अनेकांंनी आपला मदतीचा हात पुढे केला आहे. काहींनी आर्थिक तर काहींनी प्रत्यक्ष मदत करुन देशातील बांधवांना आधार दिला आहे. या कलाकारांंच्या किंबहुना खर्‍या हिरोंंच्या यादीत सर्वात आधी सोनू सूद (Sonu Sood) याचे नाव येते. सोनुने आतापर्यंत स्थलांतरित कामगारांना घरी पाठवण्यापासुन ते लोकांच्या राहण्या खाण्याची,नोकरी पर्यंत अनेक ठिकाणी सढळ हस्ते योगदान दिले आहे. आणि आता तर थेट फिलिपाईन्स (Philippines) मध्ये अडकलेल्या भारतीयांना सुद्धा मदत करण्यासाठी सोनू सरसावला आहे. कोरोनाच्या संंकटात फिलीपाईन्स मध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थी आणि देशवासियांना पुन्हा देशात घेउन येण्यासाठी सोनू ने विमानाची सोय करायला सुरुवात केली आहे. या मोहिमेतील पहिले विमान नुकतेच भारतात लॅंड झाले असुन यातील प्रवाशांनी ट्विट करुन सोनुचे आभार मानले आहेत.

Pravasi Rojgar App: लॉकडाउनच्या काळात स्थलांतरीत मजुरांसाठी देवदूत ठरलेला अभिनेता सोनू सूद आता देणार रोजगार

सोनु सुद च्या या मदतीसाठी धन्यवाद म्हणताना फिलिपाईन्स मधुन आलेल्या भारतीयांनी एक ट्विट केले होते ज्याला सोनुने रिप्लाय देत तुमची मदत केल्याने मला खुप आनंद मिळाला आता तर सुरुवात आहे अजुन पुर्ण मिशन बाकी आहे ज्याचा दुसरा टप्पा लवकरच सुरु होईल,जय हिंंद असे ट्विट केले आहे.

सोनू सूद ट्विट

सोनू सूद हा खर्‍या अर्थाने देशाचा हिरो ठरला आहे. या संंकटकाळात त्याचे योगदान अमुल्य आहे, आजवर त्याने तीन लाखांंहुन अधिकांना आपल्या घरी पाठवले आहे, अलिकडेच रक्षाबंंधनाच्या निमित्त त्याने आसाम पुरात घर तुटलेल्या एका महिलेला सुद्धा मदत केली होती.