
कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशभरात 24 मार्च ला लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून ते आतापर्यंत लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अनेक स्थलांतरित मजूरांपासून ते हॉस्पिटलमध्ये रुग्णाला बेड मिळवून देण्यापर्यंत काम करुन 'देवमाणूस' ठरलेला अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) सध्या बराच चर्चेत आहे. यामुळे अनेकांनी त्याच्या कामाचे कौतुकही केले. मात्र काही टवाळखोरांनी त्याची खिल्ली उडवली. अलीकडेच त्याला ट्विटरवर एका युजरने 'माझ्या मोबाईलच्या नेटचा स्पीट वाढवण्यासाठी माझी मदत करा' अशी विचित्र मदत मागितली होती. मात्र सोनूने त्याच्यावर जराही न रागवता अगदी गांधीगिरी स्टाईलने त्याला चोख उत्तर दिले.
'सोनू सूद सर माझ्या मोबाईलच्या नेटचा स्पीट वाढवण्यासाठी माझी मदत करा’ असे म्हटले होते. सोनू सूदने त्यावर मजेशीर रिप्लाय दिला आहे. Sonu Sood Helps UP Girl: अभिनेता सोनू सूद ने 22 वर्षीय मुलीला गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी केली आर्थिक मदत
Can you manage till tomorrow morning? right now busy with getting someone’s computer repaired, someone’s marriage fixed, getting someone’s train ticket confirmed, someone’s house’s water problem. Such important jobs people have assigned to me 😜😂😂🙏 कृपा ध्यान दें। https://t.co/Ks4TF9yqHR
— sonu sood (@SonuSood) August 14, 2020
‘तु उद्या सकाळपर्यंत मॅनेज करशील का? आता मी कोणाचा कंप्यूटर फिक्स करण्यात, लग्न जुवळवण्यात, ट्रेनचे तिकिट काढून देण्यात तसेच पाण्याची समस्या सोडवण्यात थोडा व्यग्र आहे. लोकांनी मला खूप महत्त्वाची कामे दिली आहेत’ असे सोनू सूदने रिप्लाय देत म्हटले आहे. सोनूचे हे उत्तर वाचून तो यूजरही ताळ्यावर आला असेल. ते म्हणतात ना कधीकधी शहाण्याला शब्दाचा मार पुरेसा असतो.
दरम्यान सोनू सूदने उत्तर प्रदेशमधील एका 22 वर्षीय मुलीला गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत केली आहे. सोनूच्या या मदत कार्यामुळे चाहत्यांनी त्याचं कौतुक केलं आहे.