Sonam Kapoor And Jaya Bachchan (Photo Credits: Twitter/Instagram)

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा (Sushant Singh Rajput Case) छडा लावताना समोर आलेले ड्रग्ज प्रकरण सध्या चांगलच गाजतय. ज्यामुळे हे प्रकरण लोकसभा (Loksabha) आणि राज्यसभेत (Rajyasabha) देखील चांगलेच गाजले. काल लोकसभेत भाजप नेते रवि किशन यांनी या प्रकरणावर भाष्य केल्यानंतर आज राज्यसभेत सपा नेत्या जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी रवि किशन (Ravi Kishan) यांनी फिल्म इंडस्ट्रीवर केलेल्या विधानावर टीका करत आगपाखड केली. त्याचबरोबर सरकाने फिल्म इंडस्ट्रीची मदत केली पाहिजे कारण जेव्हा जेव्हा सरकारला गरज होती तेव्हा फिल्म इंडस्ट्री नेहमीच पुढे आली आहे असं त्या म्हणाल्या. त्यांच्या या सडेतोड वक्तव्यावर प्रभावित होऊन अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) ने त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करत 'मी मोठी होऊन यांच्यासारखी बनू इच्छिते' असे या पोस्टखाली म्हटले आहे. तिच्या या पोस्टमुळे तील ट्रोलर्सच्या रडारवर आली आहे.

ट्रोलर्स तिला 'मुली तू कधीच मोठी होऊ शकणार नाही', 'तू आधीच 35 वर्षाची झाली आहेस अजून कधी मोठी होणार' असे लिहत अनेकांनी तिला ट्रोल केले आहे.

हेदेखील वाचा- Bollywood Drugs Controversy: रवि किशन यांनी लोकसभेत उठवलेल्या बॉलिवूडमधील ड्रग्जच्या मुद्द्यावर भडकल्या जया बच्चन, म्हणाल्या जिस थाली में खाते हैं उसी में छेद करते हैं

हेदेखील वाचा- Kangana Ranaut On Jaya Bachchan: जर माझ्या जागी श्वेता किंवा अभिषेक असता तर तुमची भूमिका समान राहिली असती का? कंगना रनौतचा जया बच्चन यांना सवाल

तू तर पापाची परी आहेस आणि परी कधी म्हाता-या होत नाही. असेही एकाने म्हटले आहे.

तुला अजून किती मोठं व्हायचयं असही एकाने म्हटले आहे.

अभिनेते रवि किशन लोकसभेत बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणावर बोलल्याप्रकरणी ज्येष्ठ अभिनेत्री तसेच सपा नेत्या जया बच्चन चांगल्याच भडकल्या. रवि किशन यांचे वक्तव्य हे खूप लज्जास्पद असून ते स्वत:ला फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेले आहेत. अशा परिस्थितीत असे वक्तव्य करणे म्हणजे 'ज्या थाळीत खाणे त्याच थाळीत छेद केल्यासारखे आहे असं त्या म्हणाल्या.'