Sonakshi Sinha ने शेअर केला तिचा ट्रान्सफॉर्मेशन लूक; फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक
Sonakshi Sinha Transformation Look (PC - Instagram)

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) ने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये स्वत: चा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये तिचे आश्चर्यकारक ट्रान्सफॉर्मेशन दिसून येत आहे. फोटोमध्ये सोनाक्षीला ओळखणे कठीण जात आहे. तिचा हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सोनाक्षी सिन्हाने आपला फोटो शेअर करताना योगा टाइम, असं कॅप्शन फोटोवर लिहिलं आहे. या फोटोमध्ये सोनाक्षी खुल्या केसांमध्ये आपल्या मागच्या बाजूस फ्लॉन्ट करताना दिसत आहे. स्पोर्ट्स आउटफिटमध्ये गुलाबी चटईवर उभी राहून ती सूर्य नमस्कार करत आहे.

फोटोमध्ये लोक तिची कर्वी फिगर पाहून गोंधळलेले आहेत. अनेकांना हा फोटो सोनाक्षीचा आहे यावर विश्वास बसत नाहीये. सोनाक्षी ट्रान्सफॉर्मेशनमुळे खूपचं छान दिसत आहे. सोनाक्षीच्या या ताज्या छायाचित्रांवरून हे स्पष्ट झाले आहे की, तिने घरी राहून आपल्या फिटनेससाठी खूपचं मेहनत घेतली आहे.(वाचा -  Gautam Gambhir च्या संस्थेला Akshay Kumar ने केली मोठी मदत; कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी दिले 1 कोटी रुपये)

सोनाक्षी सिन्हा इन्स्टाग्राम स्टोरी (PC - Instagram)

यापूर्वीही सोनाक्षीने एक फोटो शेअर केला होता, जो लोकांना आवडला होता. इंस्टाग्रामवर पोस्ट करत तिने लिहिलं होतं की, '#WFH म्हणजेचं वर्कआउट फ्रॉम होम.' या पोस्टमध्ये सोनाक्षीने तिची दोन छायाचित्रे शेअर केली आहेत. एका चित्रात ती पोज करताना दिसली तर दुसर्‍या चित्रात ती वर्कआउट करताना दिसली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सोनाक्षी लवकरचं ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात अजय देवगनसोबत दिसणार आहे. या चित्रपटात संजय दत्तही दिसणार आहे. तसेच सोनाक्षी 'फोलेन' नावाच्या वेब सीरिजमध्येही दिसणार आहे. या मालिकेत ती एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहे.