Bhuj The Pride of India: अजय देवगन याच्या 'भूज' सिनेमातील सोनाक्षी सिन्हा हिचा दमदार लूक रिलीज
Sonakshi Sinha's first look from Bhuj: The Pride of India (Photo Credits: Twitter)

अजय देवगन  (Ajay Devgn) याचा आगामी सिनेमा 'भूज: द प्राईड ऑफ इंडिया' (Bhuj The Pride of India) बद्दल लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सिनेमातील सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिचा फर्स्ट लूक (First Look) समोर आला आहे, हा सिनेमा 15 ऑगस्ट 2020 रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे सिनेमाचे रिलीज टाळण्यात आले आहे. त्यानंतर निर्मात्यांनी सिनेमा OTT फ्लॅटफॉर्मवर रिलिज करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हा सिनेमा डिजनी प्लस हॉटस्टारवर रिलीज करण्यात येणार आहे. भूज सिनेमातील अजय देवगन आणि संजय दत्त यांचा लूक यापूर्वी रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर आता सोनाक्षी सिन्हाचा लूक समोर आला आहे.

अजय देवगन याने सोनाक्षी सिन्हा हिचा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. ट्विटमध्ये अजय देवगन याने लिहिले, सिनेमात सोनाक्षी सिन्हा सुंदरबेन जेठा मधरपर्या ही भूमिका साकारत आहे. ती एक समाजसेवक आहे. तिने 299 महिलांसह 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान भुज एअरपोर्ट दरम्यान इंडियन एअर फोर्सची मदत केली होती. या भूमिकेसाठी सोनाक्षीचा लूक अत्यंत योग्य वाटत आहे.

पहा सोनाक्षी सिन्हा हिचा भुज सिनेमातील फर्स्ट लूक:

या सिनेमात संजय दत्त सह नोरा फतेही झळकणार आहे. या सिनेमातील नोराची भूमिका पूर्वी परिणीति चोप्रा साकारणार होती. हा सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित करण्याची मागणी अजय देवगनचे चाहते करत आहेत. परंतु, सध्या कोविड-19 च्या संकटामुळे हा सिनेमा OTT फ्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.