Somy Ali Salman Khan | | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

सलमान खान (Salman Khan) याच्यासोबतच्या तिच्या पूर्वीच्या नात्यासाठी ओळखली जाणारी बॉलिवूडची (Bollywood News) माजी अभिनेत्री सोमी अली (Somy Ali) हिने कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई (Gangster Lawrence Bishnoi) यास उद्देशून एक खुले पत्र लिहीले आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. हे पत्र तिने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारेही शेअर केले आहे. ज्यामध्ये तिने थेट बिश्नोई याच्याशी संपर्क साधला आहे. बिश्नोई याचे सलमान खानला दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीमध्ये अनेकदा नाव आले आहे. दरम्यान, सोमी हिने आपल्या पत्रात म्हटले आह की 'तू झूमवरती मिटींग घेतो.. कॉल करतोस का मला तुझ्याशी बोलायचे आहे.' तिची सोशल मीडिया पोस्टही खाली दिली आहे.

सोमी अली चर्चेत

सलमान खान याचे निकटवर्ती बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि अभिनेत्याच्या निवासस्थानाजवळ नुकत्याच झालेल्या हल्ल्यांसह गुन्हेगारी कटात लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित सहभाग असल्याचा संशय आहे. ज्यामुळे बॉलीवूडचा दंबंग खान अशी ओळख असलेल्या या अभिनेत्याच्या मुंबई येथील निवासस्थानी आणि त्याच्या व्यक्तिगत सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या अपार्टमेंटच्या बाहेर झालेल्या गोळीबारात आणि गायक A.P. शी संबंधित एका वेगळ्या घटनेत बिश्नोईच्या टोळीचा देखील सहभाग असल्याचे मानले जाते. याज प्रकणात आता सोमी अली चर्चेत आहे. (हेही वाचा, Plot To Kill Salman Khan: सलमान खान च्या पनवेल फार्म हाऊसची रेकी प्रकरणी हरियाणा मधून एकाला अटक; नवी मुंबई पोलिसांची कारवाई)

लॉरेन्स बिश्नोई यास भेटण्याची अभिनेत्रीची इच्छा

सोमी अली हिने लॉरेन्स बिश्नोईला 'भाई' असे संबोधले आहे. हा एक हिंदी भाषेतील आदरयुक्त शब्द आहे. ज्याचा अर्थ 'भाऊ' असा होतो. भाऊ असे संबोधत तिने लॉरेन्सला भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोमीने तिच्या पोस्टमध्ये नमूद केले आहे की, ती प्रार्थना करण्यासाठी राजस्थानमधील बिश्नोईच्या मंदिरात जाण्यास तयार आहे आणि महत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्यासाठी झूम कॉल करण्याची विनंती देखील केली. तिच्याशी खाजगी संभाषण करण्यासाठी तिने बिश्नोईचा दूरध्वनी क्रमांकही मागितला आहे. (हेही वाचा, Salman Khan ची एक्स गर्लफ्रेंड Somy Ali ने अभिनेत्यावर केले गंभीर आरोप; म्हणाली, 'सिगारेटने चटके देऊन वर्षानुवर्षे केली मारहाण')

अभिनेत्रीचे लॉरेन्स बिश्नोई यास खुले पत्र

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Somy Ali (@realsomyali)

सोमीने लिहिले, "नमस्ते, लॉरेन्स भाई. मी पाहिले आहे की तुम्ही तुरुंगातून झूम कॉल देखील करत आहात. मला तुमच्याशी बोलायचे आहे. आम्ही हे कसे करू शकतो हे कृपया मला कळवा. राजस्थान हे माझे आवडते ठिकाण आहे आणि मी तुमच्या मंदिरात येऊन प्रार्थना करण्यास तयार आहे ". बिश्नोईच्या टोळीने सलमान खानला दिलेल्या अनेक धमक्यांनंतर सोमीच्या पोस्टची वेळ महत्त्वाची मानली जात आहे. कुख्यात काळवीट शिकार प्रकरणाशी संबंधित अभिनेत्याविरुद्ध बिश्नोईचा द्वेष आहे हे सर्वश्रुत आहे, ज्यामध्ये सलमानवर लुप्तप्राय प्रजातीच्या हत्येचा आरोप होता.