Plot To Kill Salman Khan: सलमान खान च्या पनवेल फार्म हाऊसची रेकी प्रकरणी हरियाणा मधून एकाला अटक; नवी मुंबई पोलिसांची कारवाई

Sukha विरूद्ध FIR नोंदवण्यात आला होता. त्याच्यावर सलमान खानच्या पनवेल मधील घराची रेकी केल्याचा आरोप आहे. तसेच फार्म हाऊस वर जाताना सलमान वर हल्ला करण्याच्या प्लॅन मधील हा प्रमुख आरोपी आहे.

Plot To Kill Salman Khan: सलमान खान च्या पनवेल फार्म हाऊसची रेकी प्रकरणी हरियाणा मधून एकाला अटक; नवी मुंबई पोलिसांची कारवाई
Salman Khan (PC - Instagram)

मुंबई मध्ये दसरा दिवशी बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर आता सलमान खान (Salman Khan) याच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. सलमान खानच्या राहत्या घराजवळ गोळीबार झाल्यानंतर आता या प्रकरणात अजून एकाला हरियाणाच्या पानिपत मधून अटक केली आहे. त्याला हरियाणा मधून आता नवी मुंबई पोलिसांनी (Navi Mumbai Police) महाराष्ट्रात आणलं आहे. त्याला कोर्टातही दाखल केले जाणार आहे.

सलमान खान पनवेल येथील त्याच्या फार्म हाऊस वर जात असताना त्याला लक्ष्य करण्याचा प्लॅन करण्यात आला होता. त्यानंतरच एप्रिल 2024 मध्ये त्याच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार झाला आहे. आता नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या व्यक्तीचं नाव Sukha आहे. तो शूटर आहे.

Sukha विरूद्ध FIR नोंदवण्यात आला होता. त्याच्यावर सलमान खानच्या पनवेल मधील घराची रेकी केल्याचा आरोप आहे. तसेच फार्म हाऊस वर जाताना सलमान वर हल्ला करण्याच्या प्लॅन मधील हा प्रमुख आरोपी आहे. या प्रकरणामध्ये 5 जण यापूर्वी ताब्यात घेतलेले आहेत अशी माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे.सलमान खानच्या मुंबई मधील घराजवळ गोळीबार प्रकरणाची जबाबदारी बिष्णोई गॅंगकडून घेण्यात आली आहे.

(The above story first appeared on LatestLY on Oct 17, 2024 09:34 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).