सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ने गाण्याच्या सेटवर शूटिंगदरम्यान सहकलाकाराला दिला बेदम चोप; पाहा नेमके काय घडले
Neha Kakkar (Photo Credits: Instagram)

सध्याची सुप्रसिद्ध आणि तरुणाईला वेडं लावलेली गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) रोज नवनवीन गॉसिप्समुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी तिचा इंडियन आयडॉल मधील एका स्पर्धकाने तिच्यासोबत केलेल्या किसिंग सीनमुळे ती चर्चेत आली होती. त्यानंतर तिन नुकताच तिच्या एका म्युझिक अल्बमच्या शूटिंगचा व्हिडिओ शेअर केला आहे. या शूटिंगच्या सेटवर तिने आपल्या सहकलाकाराला लाटण्याने चांगला चोप दिला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. नेहा कक्कर हिचे व्हिडिओ आणि हॉट फोटोज नेहमीच सोशल मिडियावर व्हायरल होत असताता. त्यात आता नवीन व्हिडिओची भर पडली आहे.

हा व्हिडिओ तिच्या आगामी म्यूझिक अल्बममझधील आहे. पाहा हा मजेशीर व्हिडिओ

हेदेखील वाचा- 'Indian Idol 11' च्या ऑडिशनमध्ये गायिका नेहा कक्कड ला पाहून स्पर्धकाचा तोल घसरला, केले असे काही की परीक्षक ही झाले अवाक्

'पूछदा ही नहीं' या गाण्याचे चित्रिकरण करत असताना ती आपल्या सहकलाकाराला लाटण्याने मारताना दिसत आहे. मात्र हा केवळ तिच्या व्हिडिओमधील शूटिंगचा भाग असल्यामुळे हा व्हिडिओ पाहणारेही पोट धरुन हसत आहे.

गाण्याचे चित्रीकरण सुरु असताना नेहा आपल्या सहकाऱ्याला मारण्यासाठी त्याच्या मागे पळत आहे. व तिचे सहकारी तिला प्रोत्साहन देत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. अर्थात हा व्हिडीओ तिने गंमत म्हणून अपलोड केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. आतापर्यंत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

याआधी नेहा तिच्या ‘पूछदा ही नहीं’ (Puchda Hi Nahin) या गाण्यामुळे चर्चेत होती. हे गाणे प्रेक्षकांमध्ये अल्पावधीतच लोकप्रिय झाले. आतापर्यंत 87 लाखांपेक्षा अधिक वेळा हे गाणे युट्यूबवर पाहिले गेले आहे.