Kavita Krishnamurthy | (Photo Credits: Youtube)

प्रसिद्ध गायिका किविता कृष्णमूर्ती (Kavita Krishnamurthy) यांनी आजवर अनेक सूपरहीट गाणी दिली आहेत. त्या अनेक गाण्यांपैकी 'मिस्टर इंडिया' (Mr. India Movie) चित्रपटातील 'हवा हवाई' (Hawa Hawai) हे गाणे तर आजही रसिकांच्या हृदयात घर करुन आहे. या गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी अनेकांचे लक्ष वेधून घेतात. या गाण्यात या ओळी नेमक्या आल्या कशा आणि त्याची निर्मीत कशी झाली. याचा किस्सा स्वत: कविता कृष्णमूर्ती यांनीच संगितला. काश करुन गाण्यातील 'असी-तुस्सी' आणि 'मुंबासा' यांसारख्या शंब्दांबाबत.

कविता कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, या गाण्यापाठीमागे एक छोटी कहाणी आहे. लक्ष्मजी यांनी तीन ते चार शब्दांची रचना केली होती. वास्तवात हे केवळ चार शब्द होते. जेव्हा संगितकार लक्ष्मीजी दरवाजा उघडून नमस्ते म्हणतात. तेव्हा कोणीतरी म्हणते 'असी-तुस्सी' शब्द नोट करा. 'लस्सी-पिस्सी त्याला जोडा. दुसऱ्या कोणी म्हटले हांगकांग आहे तर राजाही पाहिजे कांग. (हेही वाचा, Actress Monalisa: प्रसिद्ध अभिनेत्री मोनालिसाने मोहक अंदाजात फोटो केले शेअर, फोटो पाहून चाहते झाले घायाळ)

कविता यांनी पुढे सांगितले, शेवटी साधारण 1.30 ते 2 च्या दरम्यान जावेद साहब (जावेद अख्तर) आले आणि त्यांनी सांगितले काल रात्री त्यांना वाटले 'मुंबासा' हा शब्द शेवटचा असायला पाहिजे. यावर सर्वांचे सहमत झाले आणि सुरुवातीचा परिचय ठरला. कविता कृष्णमूर्ती या सोनी एंटरटेनमेंट टेलीविजनवर 'इंडियन आइडल 12' च्या एका एपिसोडमध्ये 'दोस्ती स्पेशल विद कुमार शानू और कविता कृष्णमूर्ति' या कार्यक्रमात मुख्य पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी बोलताना त्यांनी हा किस्सा सागितला.