
बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि प्रतिभावान गायकांपैकी एक असलेला, अरिजीत सिंह (Arijit Singh) कदाचित कॅमेऱ्यापासून दूर असेल, पण त्याचा आवाज नेहमीच लोकांच्या मनावर जादू करतो. शेकडो हिट गाणी देणारा आणि अनेक लोकप्रिय पुरस्कार मिळविणारा अरिजित सिंह आजकाल आपल्या फ्लॅट (Flats) संदर्भात चर्चेत आहेत.
स्क्वेअर फीट इंडियाच्या वृत्तानुसार, गायक अरिजीत सिंह याने नुकतेच एक नव्हे.. दोन नव्हे तर 4 फ्लॅट्स खरेदी केले आहेत, ज्यांचे मूल्य कोटींमध्ये आहे. अरिजीतने हे फ्लॅट मुंबईच्या वर्सोवा (Versova) भागात खरेदी केले, जो पॉश परीसरापैकी एक मानला जातो.
अरिजीतने घेतलेले हे चार फ्लॅट्स 7 बंगल्यातील सविता सीएचएस नावाच्या इमारतीत आहेत. पहिल्या फ्लॅटची किंमत 1.80 कोटी असल्याचे सांगितले जाते, जो सहाव्या मजल्यावर आहे. त्याच मजल्यावर अरिजीतने आणखी तीन फ्लॅट घेतले आहेत, ज्यांचे मूल्य 2.20, 2.60 आणि 2.50 कोटी आहे. म्हणजेच अरिजीतने हे चारही फ्लॅट जवळपास 9.1 कोटीमध्ये विकत घेतले आहेत. या सर्व सदनिकांची नोंदणी 22 जानेवारी रोजी करण्यात आली होती. सेलिब्रेटी त्यांच्या सुरक्षेसाठी शक्यतो इमारतीचा संपूर्ण मजला खरेदी करतात आणि अरिजीत सिंह यानेही तेच केले आहे.
अरिजीत सिंहने 2005 मध्ये 'फेम गुरुकुल' या गायन रिअॅलिटी शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. या शो दरम्यान चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांची नजर त्याच्यावर पडली आणि त्यांनी त्यांच्या 'सावरीया' चित्रपटात 'यू शबनामी' गाण्याची संधी दिली. त्यानंतर 'मर्डर 2' च्या गाण्यांनी अरिजितला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. 2013 ची फिल्म 'आशिकी -2'मुळे अरिजित रातोरात स्टार बनला. सध्या जवळजवळ सर्व संगीतकार अरीजीतने आपल्यासाठी गावे म्हणून धडपडत असतात.