बॉलिवूडचे प्रसिद्ध पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य यांचा मुलगा ध्रुव याला कोरोना विषाणूची लागण
Singer Abhijeet Bhattacharya (PC - Facebook)

बॉलिवूडचे प्रसिद्ध पार्श्वगायक अभिजीत भट्टाचार्य (Singer Abhijeet Bhattacharya's) यांचा मुलगा ध्रुव याला कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झाली आहे. विषेश म्हणजे ध्रुवला कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. पंरतु, परदेशी प्रवास करण्याच्या उद्देशाने त्याने स्वत:ची कोरोना चाचणी केली होती. यात त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

ध्रुव हा मुंबईतील एका रेस्तराँचा मालक आहे. ध्रुवला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समजताचं त्याला घरातचं क्वारंटाइन करण्यात आलं आहे. यासंदर्भात टाईम्स ऑफ इंडिया या इंग्रजी वेबसाईटने वृत्त दिलं आहे. (हेही वाचा - 'Dil Bechara' चित्रपटाच्या निमित्ताने सुशांत सिंह राजपूतला पुन्हा पाहता येणार या कल्पनेने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती झाली भावूक; पाहा तिची पोस्ट)

दरम्यान, अभिजीत भट्टाचार्य एका शूटिंगनिमित्त कोलकात्याला गेले होते. त्यामुळे त्यांचीदेखील कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र, त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. अभिजीत यांच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं म्हटलं तर, अभिजीत यांनी आतापर्यंत विविध हिंदी गाण्यांना आवाज दिला.