'Dil Bechara' चित्रपटाच्या निमित्ताने सुशांत सिंह राजपूतला पुन्हा पाहता येणार या कल्पनेने त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती झाली भावूक; पाहा तिची पोस्ट
Rhea Chakraborty (Photo Credit: Instagram)

बॉलिवूडचा हरहुन्नरी निखळलेला तारा सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची जगातून झालेली एक्झिट अजूनही त्याचे चाहते पचवू शकले नाही. त्यामुळे आज प्रदर्शित होणारा त्याचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' (Dil Bechara) चित्रपटाला घेऊन त्याचे सर्वच चाहते उत्सुक आहेत. त्यासोबतच बॉलिवूडचे अनेक कलाकारही हा चित्रपट नक्की पाहण्याचे आपल्या चाहत्यांना आवाहन करत आहे. मग यात त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती कशी मागे राहील. तिने एक भावूक पोस्ट शेअर करुन या चित्रपटातून तिला त्याला शेवटचा पाहता येणार आहे असे सांगितले आहे.

रियाने तिच्या इन्स्टाग्रामवर 'दिल बेचारा' मधील सुशांतचा फोटो पोस्ट करुन खाली खूप छान संदेश लिहिला आहे. "तुला पाहण्यासाठी आतून एक वेगळीच ताकद लागणार आहे. तू इथे माझ्यासोबतच आहेस. मला माहित आहे की तू आहेस. मी तुझ्यावर नेहमीच प्रेम करत राहीन. माझ्या जीवनातील हिरो", असं तिने म्हटलं आहे. सुशांत सिंह राजपूत शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' आज होणार प्रदर्शित; चाहत्यांनी ट्विटरवर ट्रेंड केला #DilBecharaDay

मला खात्री आहे की, तू हे सर्व माझ्यासोबत पाहत असशील असही रियाने म्हटले आहे. मुंबई पोलिसांना काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्तीची सुद्धा चौकशी केली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' (Dil Bechara) आज OTT प्लेटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्याच्या चाहत्यांसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे आज सकाळपासून ट्विटरवर #DilBecharaDay ट्रेंड होत आहे.