सिद्धार्थ जाधव सोबत  जेव्हा रोहित शेट्टी मराठीतून म्हणाला 'दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा' (Video)
रोहित शेट्टी, सिद्धार्थ जाधव Photo Credit : Twitter

रोहित शेट्टीच्या सिनेमांमध्ये हमखास मराठी कलाकार पहायला मिळतात. लहानशी असली तरीही धम्माल पात्र चाहत्यांच्या लक्षात राहातात. रोहित शेट्टीसोबत अभिनेता सिद्धार्थ जाधव याने गोलमाल सिनेमात काम केले होते आता तो पुन्हा सिंबा () सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. दिवाळीच्या दिवसातही सिंबाचं शूटिंग सुरू आहे. दरम्यान शुटिंगमधून थोडा वेळ काढून सिद्धार्थने रोहित शेट्टीसोबत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सिंबाच्या सेट्सवर रोहित-सिद्धार्थची धम्मालमस्ती

एका व्हिडिओद्वारा रोहित शेट्टी आणि सिद्धार्थ जाधवने चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान सिद्धार्थप्रमाणेच रोहित शेट्टीनेही मराठी भाषेतून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याने हा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये कमालीचा व्हायरल झाला आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ जाधवचा वाढदिवसदेखील 'सिंबा' (Simmba) सिनेमाच्या सेट्सवर फिल्मी स्टाईलमध्ये सेलिब्रेट करण्यात आला होता.  सिम्बाच्या सेट्सवर सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवसाचं धमाकेदार सेलिब्रेशन, रणवीर सिंगचा तुफान डान्स

 

रोहित शेट्टी बॉक्सऑफिसवर पुन्हा धमाकेदार अंदाजात येणार

'सिंबा'() या सिनेमात अभिनेता रणवीर सिंग, सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सिद्धार्थ जाधव सिंबा सिनेमात एका पोलिसाच्या भूमिकेत आहे. मात्र त्याची नेमकी भूमिका काय आहे हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे.  सिंबा () सिनेमा 28 डिसेंबर 2018 ला रीलिज होणार आहे. त्यामुळे हा सिनेमा पाहण्याचं आवाहनही सिद्धार्थ, रोहितने केलं आहे.