सिम्बाच्या सेट्सवर सिद्धार्थ जाधवच्या वाढदिवसाचं धमाकेदार सेलिब्रेशन, रणवीर सिंगचा तुफान डान्स
सिद्धार्थचा बर्थ डे Photo Credit : Instagram

अभिनेता रणवीर सिंग आणि सिद्धार्थ जाधव यांच्यामधील प्रकर्षाने साम्य असलेली एक गोष्ट म्हणजे त्याच्यामधील एनर्जी... मग हे दोघंही एकत्र असतील तर किती धम्माल करत असतील ? याचा विचार केलेलाच बरा, पण नुकत्याच सिद्धार्थने शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्यांची तुफान धमालमस्ती पहायला मिळाली आहे. यंदा रोहित शेट्टीच्या 'सिंबा' चित्रपटाच्या सेट्सवर सिद्धार्थचा वाढदिवस साजरा करण्यात आला. त्या वेळी केक कापताना केलेली धम्माल मस्ती सिद्धार्थने इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे.

सिद्धार्थ जाधवचा बर्थ डे २३ ऑक्टोबर या दिवशी असतो. यंदा वाढदिवसादिवशी सिंबाचं शुटिंग असल्याने सिद्धार्थ कामात होता. मात्र शुटिंगमधून वेळ काढून सार्‍या युनिटने सिद्धार्थचा बर्थ डे सेलिब्रेट केला. यावेळेस फक्त केकच कापला नाही तर चक्क फटाके वाजवण्यात आले. पाऊस, फूलबाज्या लावून आतषबाजी करण्यात आली. त्यामधून खास एन्ट्री घेऊन सिद्धार्थने केक कापला. रणवीर आणि सिद्धार्थने 'बार बार दिन ये आए'... गाण्यावर डान्स केला.

सिद्धार्थच्या बर्थ डे सेलिब्रेशनसाठी रणवीर सिंग, सिनेमाचा दिग्दर्शक रोहित शेट्टी उपस्थित होता. तसेच इतर क्रू मेंबर्सही होते. सिंबा हा अ‍ॅक्शनपट सिनेमा आहे. खूप दिवसांनी रोहित एक नवा सिनेमा घेऊन येत असल्याने चाहत्यांमध्येही कमालीची उत्सुकता आहे. Simmba Teaser : रणवीरची जबरदस्त अॅक्शन ; चाहत्यांसाठी पर्वणी