
बहुचर्चित ‘शोले’ चित्रपटातील अभिनेत्री गीता सिद्धार्थ काक (Gita Siddharth Kak) यांचे शनिवारी सायंकाळी मुंबईत निधन झालं आहे. गीता यांनी आपल्या चित्रपटसृष्टीतील करिअरमध्ये अनेक प्रसिद्ध चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या होत्या. त्या प्रसिद्ध निर्माता सिद्धार्थ काक (Siddharth Kak) यांच्या पत्नी होत्या. गीता काक यांनी 'शोले', 'त्रिशूल', 'डिस्को डान्सर', 'राम तेरी गंगा मैली', 'शौकीन', 'अर्थ', 'एक चादर मैली सी', 'गमन', 'दूसरा आदमी' आदी सुपरहिट चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
गीता यांनी गुलजार दिग्दर्शित ‘परिचय’ या चित्रपटातून आपल्या चित्रपटसृष्टीतील करिअरला सुरुवात केली होती. तसेच 'गरम हवा' या 70 च्या दशकात प्रदर्शित झालेल्या चित्रपटात गीता यांची भूमिका प्रचंड गाजली होती. (हेही वाचा - Viju Khote Passes Away: अभिनेते विजू खोटे यांचे सदाबहार डायलॉग; शोले, अशी ही बनवाबनवी ते अंदाज अपना अपना)
View this post on Instagram
गीता यांनी लोकप्रिय टीव्ही शो 'सुरभी'चे आर्ट डायरेक्टर पद सांभाळले होते. हा कार्यक्रम 1990 ते 2001 पर्यंत दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित होत होता. गीता या उत्तम कलाकार होत्या. तसेच त्या एक उत्तम सामाजिक कार्यकर्त्याही होत्या. गीता आणि सिद्धार्थ यांची मुलगी अंतरा ही एक उत्तम फिल्ममेकर आहे.