Shilpa Shetty नव्या हेअरस्टाइलवरुन ट्रोल, युजर्सने दिल्या अशा प्रतिक्रिया
शिल्पा शेट्टी (Photo Credits-Instagram)

बॉलिवूड मधील अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्रा (Shilpa Shetty-Kundra) हिने नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केला आहे. तो पाहून आता युजर्सने तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या व्हिडिओमध्ये शिल्पा ही जिम मध्ये असल्याचे दिसून येत आहे. मात्र वर्कआउट सुरु करण्यापूर्वी ती तिचे मोकळे केस बांधते. पण तिची हेअरस्टाइल बघून युजर्सने तिला आता ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

शिल्पा शेट्टी हिने खास प्रकारचा हेअरकट केला आहे. पण वर्कआउट पूर्वी ती केस बांधताना दिसून येत आहे. तिचा हा अंडरकट बज कट हा मात्र सोशल मीडियातील युजर्सला आवडलेला नाही. त्यामुळेच तिला आता ट्रोल केले जात आहे. एका युजर्सने ट्रोल करत असे म्हटले की, अर्धी टकली झाली कुंद्रु.(Shama Sikander Hot Yoga Pose Photo: शमा सिकंदर हिचे योगा करतानाचे हॉट फोटो व्हायरल)

शिल्पा शेट्टीने हेअर स्टाइल फ्लॉन्ट करत एक खास कॅप्शन सुद्धा लिहिले आहे. तिने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, जेव्हा तुम्ही जोखिमेशिाय आणि आपल्या कंम्फर्ट झोन मधून बाहेर पडण्याशिवाय प्रत्येक दिवस जगू शकत नाहीत. त्यासाठी माझा नवा हेअरकट असो किंवा नवी एरोबिक वर्कआउट. तिचे हे अशा पद्धतीचे कॅप्शन पाहता ती तिच्या फिटनेबद्दल नेहमीच किती जागृक असते हे दिसून येते. तसेच तिच्या फिटनेसचे पाहून ही खुप जण प्रोत्साहित होतात.