बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) गेल्या अनेक वर्षांपासून सिनेमांपासून दूर आहे. मात्र शिल्पाला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. तब्बल 13 वर्षांनंतर आता शिल्पा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. शिल्पा लवकरच निकम्मा (Nikamma) या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची माहिती खुद्द शिल्पाने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली आहे. तसंच या सिनेमाबद्दल खूप उत्सुक असल्याचेही तिने सांगितले.
शिल्पाने पोस्ट शेअर करत लिहिले की, "हा, हे खरे आहे की... 13 वर्षांचा माझा ब्रेक आता संपणार आहे. तुम्ही लवकरच 'निकम्मा' सिनेमातून मला पाहू शकाल, हे सांगताना मी खूप उत्सुक आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन शब्बीर खान याने केले असून सिनेमात शर्ली सेतिया आणि अभिमन्यु दसानी यांसारख्या प्रतिभावान कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. मला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी खूप धन्यवाद." (व्हिडिओ: मर्लिन मुनरो करण्याच्या नादात फसली आणि स्वत:वरच हसली शिल्पा शेट्टी; काय घडलं स्वत:च पाहा)
शिल्पा शेट्टी पोस्ट:
यापूर्वी 2007 मध्ये आलेल्या 'अपने' सिनेमात शिल्पा शेट्टी झळकली होती. त्यानंतर छोट्या पडद्यावर रियालिटी शोज मध्ये 'जज'च्या भूमिकेत शिल्पा आपल्याला दिसली. तिने 'नच बलिये' आणि 'सुपर डांसर' यांसारख्या शोज चे परिक्षण केले. आता 13 वर्षांनंतर शिल्पा शेट्टीचा रुपेरी पडद्यावरील कमबॅक पाहण्यासाठी तिचे चाहते उत्सुक आहेत.