Shilpa Shetty हिच्या शूजची 'ही' अजब फॅशन पाहून तुम्हीही माराल डोक्यावर हात; Watch Photos
Shilpa Shetty Shoe Fashion (Photo Credits: Instagram)

सोशल मिडियावर बरीच सक्रिय असलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचे फिटनेससह मजेशीर व्हिडिओ देखील सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. नुकतेच तिच्या घरी आलेल्या गणपती बाप्पाचे आणि त्याच्या विसर्जनाचे व्हिडिओ देखील सोशल मिडियावर बरेच व्हायरल झाले होते. लॉकडाऊनच्या काळातही शिल्पा सोशल मिडियावर आपले अनेक व्हिडिओ, फोटोज शेअर करुन आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत होती. नुकतीच ती आपल्या सासू बाईंसोबत शॉपिंगला गेली असता अनेक मिडिया पत्रकारांनी तिचे फोटो टिपले. यावेळी तिचे फोटो काढल्यानंतर तिच्या शूजकडे सर्वांचे लक्ष गेले. तिच्या शूजची (Shoe Fashion) अजब फॅशन पाहून तुम्हीही चक्रावाल.

व्हिडिओ जर्नलिस्ट योगेन शाह यांनी आपल्या कॅमे-यात टिपलेले हे फोटो पाहून तिची शूजची स्टाईल बघता तुम्हीही डोक्यावर हातावर मारल्याशिवाय राहणार नाही. Happy Birthday Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी च्या वाढदिवसानिमित्त पती राज कुंद्रा ने पोस्ट केला एक रोमँटिक व्हिडिओ, हटके स्टाईलमध्ये दिल्या शुभेच्छा

पाहा फोटोज:

 

View this post on Instagram

 

#shilpashetty clicked in suburbs today. #yogenshah

A post shared by yogen shah (@yogenshah_s) on

या फोटोमध्ये तिने आपल्या पायात दोन वेगवेगळे शूज घातलेले दिसतील. त्यांची स्टाईल आणि रंग देखील वेगवेगळे आहेत. आता हे नक्की शिल्पाने फॅशन म्हणून घातले की ती विसरली हे तिलाच माहित नाही का!

अलीकडेच तिचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. शिल्पाच्या घराच्या गणपतीचे विसर्जन (Ganpati Visarjan) झाल्यावर तिने आपल्या घराबाहेर उभे असलेल्या मिडिया प्रतिनिधींना प्रसाद वाटला. व्हिडिओत शिल्पा प्रसादाची प्लेट घेऊन बाहेर येते आणि सांगते, "प्रसाद घ्या फक्त प्लेट परत द्या." हे ऐकल्यानंतर तेथे उपस्थित सर्व लोकांना हसू आवरले नाही.