Shilpa Shetty (Photo Credits: Instagram)

मुंबईतील वांद्रे पोलीस स्थानकात बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन बराई नावाच्या तक्रारदाराने वांद्रे पोलिसांना माहिती देत असे म्हटले की, जुलै 2014 पासून ते आतापर्यंत एसएफएल प्रायव्हेट कंपनीचे डायरेक्टर शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, काशिफ खान, दर्शित शाह आणि त्यांच्या साथीदाराने बराई याची फसवणूक केली आहे.('कंगना रनौत अंमली पदार्थाचा ओव्हरडोज करून अशी वक्तव्ये देत आहे, तिचा पद्मश्री परत घ्या व तिच्यावर गुन्हा दाखल करावा- Minister Nawab Malik)

बराई याने पोलिसांना सांगितले की, जर त्याने त्यांच्या कंपनीची फ्रेंचाइजी घेण्यासह पुण्यातील कोरेगाव परिसरात स्पा आणि जीम सुरु केल्यास मोठा फायदा होईल. बराई याला यासाठी 1 कोटी 59 लाख 27 हजार रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी लावले. मात्र त्यानंतर बराई याचे पैसे हे आरोपींनी आपल्या फायद्यासाठी वापरले. परंतु जेव्हा पैसे परत मागितले तेव्हा बराई याला धमकावले गेले.(Complaints Filed Against Kangana Ranaut: अभिनेत्री कंगना राणौत विरोधात पुण्यामध्ये दोन तक्रारी दाखल, स्वातंत्र्य चळवळीवर वक्तव्य केल्याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी)

तक्रार दाखल केल्यानंतर वांद्रे पोलिसांनी शिल्पा शेट्टी, राज कुंद्रासह अन्य आरोपींच्या विरोधात IPC कलम 406.409,420,506,34 आणि 120(B) अंतर्गत गु्न्हा दाखल केला असून तपास सुरु केला आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणी आरोपींची चौकशी करु शकते. राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी यांची बाजू जाणून घेण्यासाठी पोलीस लवकरत त्यांना सुद्धा संपर्क करु शकते.