Shilpa Shetty And Raj Kundra (Photo Credits: Facebook)

अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि तिचे पती राज कुंद्रा (Raj Kundra)  यांच्या सहित इतर काहींच्या विरोधात सोने गुंतवणूक (Gold Investment) योजनेत फसवणुक केल्याचे आरोप लगावण्यात आले आहेत. या संबंधी गुरुवारी खार पोलिस ठाण्यात परदेशस्थ सचिन जोशी या भारतीय व्यक्तीने तक्रार नोंदवली आहे. प्राप्त माहितीनुसार, सत्युग गोल्ड (Satyug Gold) या खाजगी कंपनीच्या संचालकपदी शिल्पा आणि राज हे नियुक्त होते, त्यावेळी सचिन जोशी यांनी 2014 मध्ये या कंपनीत 18 लाख 58 हजार रुपये किंमतीचे 1 किलो सोने विकत घेऊन गुंतवणूक केली होती, यावर पाच वर्षांनी परतावा मिळणार असे आश्वासन देण्यात आले होते, मात्र काही दिवसानंतर ही कंपनी बंद झाली आणि ऑफिसला सुद्धा टाळं ठोकण्यात आल्याचे समजले. यावरून शिल्पा आणि राज यांच्याविरुद्ध सचिन जोशी (Sachin Joshi)  यांनी तक्रार नोंदवली आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी 13 वर्षांनंतर 'निकम्मा' चित्रपटातून करणार कमबॅक

सचिन जोशी यांच्या तक्रारीनुसार, 2014 साली सोने विकत घेऊन सत्युग गोल्ड कंपनीने पाच वर्षात परतावा मिळणार असे आश्वासन दिले होते. मात्र 25 मार्च 2019 मध्ये त्यांची योजना समाप्त झाली तरी परतावा काही आला नाही. त्यावेळेस, कंपनीचे वांद्रेतील बीकेसीतील कार्यालय बंद झाल्याचे सुद्धा आढळून आले. दुसरीकडे शिल्पा शेट्टी, कुंद्रा यांनी या कंपनीच्या संचालकपदावरुन मे 2016 आणि नोव्हेंबर 2017  मध्ये राजीनामा दिल्याचे आढळून आले. या प्रकरणी अद्याप शिल्पा किंवा राज यांच्यावर अधिकृत गुन्हा दाखल झालेला नसून चौकशी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या घरी कन्यारत्न; Surrogacy मार्फत दुसऱ्यांदा मिळवलं मातृत्व

दरम्यान, राज कुंद्रा यांच्यासोबत शिल्पा ने मागील काही काळात अनेक व्यवसायाची सुरुवात केली आहे, अक्षय कुमार सोबत टाय अप करून या कपलने यापरी पहिला वाहिला सेलिब्रिटी TV कॉमर्स चॅनेल बेस्ट डील TV सुरु केला होता. याशिवाय रिअल इस्टेट, फॅशन, फूड चॅनल, आयपीएल टीम यामध्ये सुद्धा शिल्पा आणि राज यांची गुंतवणूक आहे.