गर्लफ्रेंड शिबानी दांडेकर हिच्या वाढदिवसानिमित्त Farhan Akhtar ने शेअर केला रोमँन्टिक फोटो, कलाकारांनी दिल्या शुभेच्छा
फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर (Image Credit: Instagram)

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) हा गेल्या काही काळापासून अभिनेत्री शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) हिला डेट करत आहे. दोघांच्या अफेरबद्दल खुप चर्चा केली जाते. अशातच आज शिबानी हिच्या वाढदिवसानिमित्त फरहान याने आपल्या सोशल मीजियात एक अत्यंत रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोत शिबानी आणि फरहान यांच्या नात्याची केमिस्ट्री ब्लॅक अॅन्ड व्हाइट रंगाच्या फोटोतून दिसून येत आहे.(Abhishek Bachchan हातावरील शस्त्रक्रियेनंतर 'मर्द को दर्द नही होता' म्हणत चैन्नई ला कामावर परतला; खास फोटो शेअर करत चाहत्यांचे मानले आभार)

फरहान अख्तर याने फोटो शेअर करत असे म्हटले की, ''With all my heart ❤️ happy birthday Shu. Love you.''(TMC खासदार आणि अभिनेत्री Nusrat Jahan बनली आई, मुलाला जन्म दिल्याची दिली गोड बातमी)

 

View this post on Instagram

 

A post shared by Farhan Akhtar (@faroutakhtar)

याआधी शिबानी हिने एक फोटो शेअर केला होता. त्यामध्ये तिने तिच्या मानेवर फरहान याच्या नावाचा टॅटू दिसून आला होता. हा फोटो समोर आल्यानंतर फरहान आणि शिबानी यांच्या नात्याचा चर्चा अधिकच रंगत आहेत. तसेच आता फरहान याने सुद्धा वाढदिवसानिमित्त आपल्या भावना व्यक्त करत शिबानी हिला शुभेच्छा दिल्या आहेत.

वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास फरहान अख्तर याचा सिनेमा तुफान अमेझॉन प्राइमवर प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमाला संमिश्र प्रतिसाद प्रेक्षकांकडून दिला गेला.