FTII (संग्रहित संपादित प्रतिमा)

फिल्ममेकर शेखर कपूर (Shekhar Kapur) यांची आता FTII (Film and Television Institute of India)च्या अध्यक्ष आणि गर्व्हनिंग काऊंसिलचे नवे चेअरमन ( FTII Society & Chairman of Governing Council) म्हणून निवड झाली आहे. काल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर (Prakash Javadekar) यांनी याबद्दल घोषणा केली आहे. दरम्यान टेलिव्हिजन प्रोड्युसर B P Singh यांच्याकडून आता कारभार शेखर कपूर यांच्याकडे येणार आहे. B P Singh यांचा कार्यकाळ मार्च 2020 मध्येच संपला होता मात्र कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. शेखर कपूर यांची नियुक्ती आता 3 मार्च 2023 पर्यंत असेल.

शेखर कपूर हे मासूम, मिस्टर इंडिया, एलिझाबेथ, बैंडिट क्वीन या सिनेमांमधून रसिकांसमोर आले होते. भारतीय सिनेमांसोबतच आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील शेखर कपूर यांच्या कामाची दखल घेतली जाते. 22 व्या वर्षी सीए बनलेले शेखर कपूर पुढे सिने क्षेत्राकडे वळले. 'मासूम' सारख्या संवेदनशील विषयाच्या सिनेमामधून त्यांनी 1983 साली दिग्दर्शनाला सुरूवात केली. हिंदी सिनेमांमधील 'मासून' हा एक क्लासिक सिनेमा मानला जातो. यामध्ये नसीरूद्दीन शाह, शबाना आज़मी, उर्मिला मातोंडकर, जुगल हंसराज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

प्रकाश जावडेकर यांचे ट्वीट

FTII Society ही 24 जणांची कमिटी असते. यामध्ये 12 ex-officio members आणि आर्टव कल्चर क्षेत्रातील 12 जण एकत्र काम करत असतात. सिनेक्षेत्रामधून शेखर यांची FTII Society च्या अध्यक्षापदी निवड झाल्यानंतर रणवीर शौरी, प्रसून जोशी सह अनेकांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.